Fake Doctor: 'त्या' बनावट डॉक्टरने गोव्यात बसवले बस्तान? कारवारमधून गाशा गुंडाळला; लोलये परिसरात थाटला दवाखाना Video

Karwar Fake Doctor In Loliem: कर्नाटकातील सदाशिवगड, कारवारमध्ये या डॉक्टरने बराच धुमाकूळ घातल्याची चर्चा आहे. त्या परिसरातील एका स्थानिक यूट्यूब न्यूज चॅनलने या डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे.
Karwar Fake Doctor In Loliem
Karwar Fake Doctor In LoliemDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अर्धांगवायूवर (पॅरालेसीस) कोणतेही होमिओपॅथी उपचार करताना इंजेक्शन दिले जात नाही. मात्र, कारवारमध्ये या आजारावर इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टरने सध्या दक्षिण गोव्यात लोलये परिसरात आपला मुक्काम हलवला आहे. अगदी किरकोळ किमतीचे हे इंजेक्शन (बनावट) दीड हजार रुपयांना विकले जात असून राज्यातील अनेक रुग्ण त्याला बळी पडल्याची भीती आहे.

कर्नाटकातील सदाशिवगड, कारवारमध्ये या डॉक्टरने बराच धुमाकूळ घातल्याची चर्चा आहे. त्या परिसरातील एका स्थानिक यूट्यूब न्यूज चॅनलने या डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. या चॅनलच्या मते या डॉक्टराकडून एकच इंजेक्शन वारंवार वापरले जात आहे. त्याशिवाय हा डॉक्टर दीड ते दोन हजार रुपये एका इंजेक्शनसाठी रुग्णांकडून घेत होता.

जेनरिक औषधेही या डॉक्टरकडून अव्वाच्या सव्वा दराने रुग्णांना विकत होता. विशेष बाब म्हणजे या डॉक्टरबरोबर त्याचा मुलगाही त्याला या व्यवसायात मदत करीत असल्याचे समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत वृत्तात म्हटले आहे.

Karwar Fake Doctor In Loliem
Goa Fake Police: डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

ज्यावेळी सदाशिवगड येथील या डॉक्टरला लोकांनी खडसावून विचारणा करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी आपली चूक कबूल केली आहे आणि यापुढे असा प्रकार करणार नसल्याचे सांगितले. चॅनलच्या मते जे लोक उपचारासाठी जात होते, ते लोक या डॉक्टरच्या हाती वीस ते तीस हजार रुपये देऊन येत होते, परंतु उपचार काही होत नसल्याचे दिसून आल्यानंतर लोकांचे डोळे उघडले. या चॅनलने दावा केला आहे की, कारवारमध्ये ९५ टक्के अशाप्रकारे उपचार करण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा सुरू आहे.

Karwar Fake Doctor In Loliem
Fake Parcel Scam: फेक पार्सल स्कॅमचा पर्दाफाश! ओडिशातील एकाला अटक; संशयिताच्या फोनतपासणीत धक्कादायक बाबी समोर

आरोग्य खाते लक्ष देणार काय?

अर्धांगवायूवर होमिओपॅथी वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरने आता कारवारातून आपला गाशा गुंडाळून गोव्यात मुक्काम ठोकल्याची चर्चा आहे. लोलये परिसरात त्यांनी आपल्या प्रसिद्धीसाठी ज्या काही क्लृप्त्या करयला हव्या असतात, त्या केल्या आहेत. त्यामुळेच सध्या त्याचे नाव मडगावपर्यंत येऊन पोहोचले आहे. सध्या सर्पदंशावरील बनावट औषधावरून राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच अशा बनावट डॉक्टरांचा वावर असल्यास ते आरोग्य खात्याला आव्हानच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com