सात दिवसांत मास्टरमाईंडचे नाव समोर न आल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार; मंत्री तवडकरांच्या नावाने व्हायरल होतोय फेक मेसेज

Rama kankonkar Assault Case: मंत्री रमेश तवडकरांनी याबाबत असे कोणतेही विधान केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, मेसेज खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे.
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarX
Published on
Updated on

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. हल्ल्यामागील सूत्रधाराला अटकेच्या मागणीसाठी शुक्रवारी विरोधी पक्षातील नेते आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पणजीत जोरदार आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली.

रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्यामागील सूत्रधाराला लवकरच अटक करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आंदोलकांना दिले. दरम्यान, सूत्रधाराला अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तर, सोमवारी गोवा बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आलाय. अशात मंत्री रमेश तवडकरांच्या नावाने एक फेक मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मास्टरमाईंडचे नाव समोर न आल्यास तवडकर राजीनामा देणार असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

Ramesh Tawadkar
भोपाळ ते गोवा जाणाऱ्या बसमध्ये सुरु होता अजब प्रकार; RTO अधिकाऱ्यांनी प्रवासी बनवून केला भांडाफोड

रामा काणकोणकर यांच्या हल्ल्यामागील सूत्रधाराचे नाव मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर न केल्यास आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर मंत्रिपदाचा राजीनामा देणार, असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

तसेच, मास्टरमाईंडचे नाव जाहीर करण्यासाठी त्यांनी सात दिवसांची मुदत दिल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान, हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे तवडकरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Ramesh Tawadkar
11 गायी ठार; काणकोण - कारवार महामार्गावर पहाटेच्या सुमारास झाला भीषण अपघात

राजीनाम्याचा दावा करणारा हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचा मंत्री तवडकरांनी स्पष्ट केले आहे. रामा काणकोणकर यांच्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

दिवसाढवळ्या सामाजिक कार्यकर्त्यावर झालेला हल्ला धक्कादायक आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारा असल्याचा आरोप विरोधकांनी केला. हा हल्ला लोकशाही आणि राज्यातील प्रत्येक गोमंतकीयावर असल्याचेही विरोधी पक्षातील आमदार म्हणाले.

काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागील राजकीय कनेक्शन देखील शोधून काढण्याची मागणी विरोधी पक्षातील आमदारांनी शुक्रवारी आंदोलनावेळी केली. राजकारणी आणि गुंड यांच्यातील संबंध शोधून काढण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com