liquor Sized
liquor SizedDainik Gomantak

Banda : गोवा बनावटीची दारु जात होती महाराष्ट्रात; पोलिसांच्या हाती तब्बल पावणेदोन कोटींचे घबाड

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कुडाळ पथकाची कारवाई
Published on

Banda : गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कुडाळ भरारी पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई शुक्रवारी सांयंकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाक्यावर करण्यात आली. या कारवाईत तब्बल 2 कोटी 12 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक होणार असल्याची खात्री लायक माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कुडाळ पथकाला होती. त्यानुसार त्या वाहनावर गेले काही दिवस पोलिस करडी नजर ठेवून होते.

शुक्रवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाक्यावर एमएच 12 एलटी 7617 हा कंटेनर आला असता त्याला तपासणीसाठी थांबवले. यावेळी कंटेनरची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे उघड झाले.

liquor Sized
New Education Policy: गोव्यात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

या कारवाईत गोवा राज्यात निर्मिती केलेली दारु जप्त करण्यात आली. या कारवाईत संशयित राजशेखर सोमशेखर परगी (41) ,(वाहनचालक) रा. ओल्ड हूबळी ता.हुबळी जि.धारवाड, कर्नाटक व संशयित रहमतुल्लाह कासीम खान,(41) (वाहनक्लिनर) रा. कल्लमानगर ता. यल्लापूर उत्तरकन्नडा, कारवार, कर्नाटक यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत 1 कोटी 87 लाख 20 हजार रुपयांची दारु तर 25 लाखाचा कंटेनर व इतर मुद्देमाल 12 हजार असा एकूण 2 कोटी 12 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com