Fake Cashew in Goa : गोव्यात बनावट काजूची सर्रासपणे विक्री

वजन आणि माप खात्याने तिसवाडी, बार्देश व सासष्टी तालुक्यात सुकामेवा विकणाऱ्या 12 मिठाईच्या दुकानांवर छापे टाकून 10 लाखांचा माल जप्त केला.
Fake Cashew in Goa
Fake Cashew in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Fake Cashew in Goa : बाजारात बनावट काजू आणि सुका मेवा विकला जात असल्याची तक्रार काहींनी केली होती. यावर वजन आणि माप खात्याने तिसवाडी, बार्देश व सासष्टी तालुक्यात सुकामेवा विकणाऱ्या 12 मिठाईच्या दुकानांवर छापे टाकून 10 लाखांचा माल जप्त केला. खात्याच्या 3 वेगवेगळे पथक दिवसभर कामाला लागले होते. ही कारवाई पुढील आठवड्यातही सुरूच राहिल, असे दक्षिण गोवा सहाय्यक नियंत्रक नितीन पुरुषन यांनी सांगितले.

बार्देश तालुक्यात सहा ठिकाणी कारवाई करत काजुची 389 पाकिटे, मनुकाची 48, बदाम 118, मसाला 20, चॉकलेटची 134 पाकिटे जप्त केलेत. सासष्टीत 5 दुकानांवर कारवाई करुन प्रत्येकी अर्धा किलो काजुची 396 पाकिटे, मनुका 71, बदाम 55, मसाला 118, चॉकलेटची 361 पाकिटे तर पणजीत एका दुकानातून काजुची 285 पाकिटे जप्त करण्यात आली.

Fake Cashew in Goa
Ravi Naik : ...तर गोव्यातल्या बारमालकांचं दिवाळं निघेल

ग्राहकांनी जागरूक राहावे

ग्राहकांनी मिठाई व सुकामेवा विकत घेताना काळजी घ्यायला हवी. भेसळ व बनावट मिठाई बाजारात विक्रीस येऊ शकते. पाकिटावर दर, पदार्थ केव्हा, कुठे तयार झाला व वजन तपासून घ्यावे. ग्राहकांनीच जागृत राहावे. तर विक्रेत्यांनी कारवाई टाळण्यासाठी दुकानात माल ठेवताना काळजी घ्यावी, असे असे आवाहन वजन माप खात्याचे सहाय्यक नियात्रक नितीन पुरुषन यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mulgao Accident
 Goa Facebook Part Time Job Scam
Salaulim Dam Water Level
Lavu Mamledar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com