फडणवीसांनी फक्त 10 मार्चपर्यंत वाट बघावी: लक्ष्मीकांत पार्सेकर

मी निवडणूक लढवू नये म्हणून पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी खूप प्रयत्न केले; लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे वक्तव्य
Laxmikant Parsekar
Laxmikant ParsekarDainik Gomantak
Published on
Updated on

Laxmikant Parsekar: विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मध्यंतरी गोव्याच्या राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली होती. भाजपने तिकीट नाकारल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी पक्षाला पाठ दाखवत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. पक्षातर्फे मनधरणी केली असूनही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आता निवडणूक प्रचारवेळी त्यांनी भाजप आणि निवडणूक प्रभारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Laxmikant Parsekar
'जनतेला चुकीचा आणि गैर कारभाराचा फटका, भाजप हा गोव्याचा द्वेष करणार पक्ष'

गोव्यातील एका खासगी माध्यमाशी संवाद साधत असताना त्यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले. ते म्हणाले की, 'मी निवडणूक लढवू नये म्हणून पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) खूप प्रयत्न केले. पण मला जनतेसाठी काम करायची इच्छा असल्याने मी माझ्या निर्णय बदलला नाही. त्यामुळे पक्ष सोबत नसला तर पक्षाविनासुद्धा मी ही निवडणूक (Goa assembly Elections 2022) लढवण्यास सज्ज आहे. मी ही निवडणूक जिंकणार नसल्याचे पक्षाचे मत आहे. याबाबत फडणवीसांनी मी यावेळी हरणार असल्याची लोकांची दिशाभूल केली आहे. आणि हेच त्यांनी पक्षातील वरिष्ठांपर्यंत ही पोहोचवले आहे.'

फडणवीसांचा अंदाज कसा चुकीचा आहे, हे त्यांना वेळ आल्यावर कळेलच. फक्त 10 मार्चपर्यंत वाट बघायची आहे. उलट त्यांनाच या निवडणुकीत खूप कष्ट करावे लागत आहेत. मुळातच जनता माझ्यासोबत आहे, पण त्यांनाच या टोकापासून त्या टोकापर्यंत माणसे जमा करावी लागत आहेत. तेच चेहरे, तेच फेटे, तेच शेले. गोव्यात मी माझ्या घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे. आमचे पद्धतशीररित्या काम सुरू आहे. जाहीरपद्धतीने जरी सुरू नसले तरी लोकांपर्यंत मी पोहोचत आहे. गेल्या पाच वर्षात पक्षामुळे लोकांना जे चिमटे सोसावे लागलेत त्यामुळे आता लवकरात लवकर त्यांना सुखी आणि निर्मळ जीवन मिळण्याची इच्छा आहे', असे म्हणत त्यांनी भाजपवर टोला लगावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com