Abhishek Singhvi Criticism in gov bjp
Abhishek Singhvi Criticism in gov bjpDainik Gomantak

'जनतेला चुकीचा आणि गैर कारभाराचा फटका, भाजप हा गोव्याचा द्वेष करणार पक्ष'

केंद्रासह गोव्यातही भाजपने नैतिक, राजकीय आणि घटनात्मक मूल्यांचा ऱ्हास केलाय; अभिषेक सिंघवी
Published on

पणजी : भाजप नेतृत्वावर टीका करताना, काँग्रेसचे जेष्ठ नेते अभिषेक सिंघवी यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या बढाया मारत आहेत, तर गोव्याचा या तीनही क्षेत्रात काहीच विकास झालेला नाही उलट लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. अभिषेक सिंघवी यांनी रविवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, "जर गोवा खरोखरच भारताचे नंदनवन असेल, तर माझा विश्वास आहे की भाजप हा गोव्याचा द्वेष करणार पक्ष आहे."

Abhishek Singhvi Criticism in gov bjp
भाजपच्या कमिशनची रक्कम विकासाचे प्राधान्यक्रम ठरवते, सरदेसाईंची बोचरी टीका

कॉंग्रेस (Congress) नेत्या व मीडिया प्रभारी अलका लांबा (Alka Lamba) आणि इतर यावेळी उपस्थित होते. सिंघवी म्हणाले, मोदींनी गोव्यातील भाजप सरकारच्या कारभारात डोकावले पाहिजे, मग ते पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञानात भरभराटीचे आहे की ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे हे त्यांना कळेल.

भाजपच्या राजवटीत गोव्यात केवळ पर्यटन क्षेत्रच नाही, तर मच्छिमारांचे मूलभूत जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय केंद्रात आणि गोव्यातही भाजपने नैतिक, राजकीय आणि घटनात्मक मूल्यांचा ऱ्हास केला आहे. असे सिघावी म्हणाले.

Abhishek Singhvi Criticism in gov bjp
आपकडून काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठे नुकसान, मोरेन रिबेलो झेंडा फडकवणार का?

भाजपने (BJP) कृत्रिम बहुमत दाखवून सत्ता बळकावली. हे त्यांनी मणिपूर आणि त्यानंतर गोव्यात केले. त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातही तो प्रयत्न केला. भाजप लाज न बाळगता उपदेश करते आणि पॉज न घेता आमदार पळवते. यावरून भाजपचा खरा चेहरा स्पष्ट होतो.

ते म्हणाले की, भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी ठरला आहे, गोव्यातील जनतेला चुकीचा कारभार आणि गैर कारभाराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री (CM) गोव्यातील जनतेची काळजी घेण्यात अपयशी ठरले आहेत, असे कोविड मृत्यूंचा संदर्भ देत ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com