Kalasa Cannal: कळसा प्रकल्पामुळे समुद्राचा खारटपणा वाढणार

समुद्राला मिळणारे गोड्या पाण्याचे प्रवाह धरणाने बंदिस्त झाल्याने भारतातल्या बऱ्याच किनारपट्टीवरच्या प्रदेशातल्या मत्स्यसंपदेवरती प्रतिकूल परिणाम उद्‍भवलेले आहेत.
Kalasa Banduri project
Kalasa Banduri projectDainik Gomantak
Published on
Updated on

Kalasa Cannal: म्हादई जल विवाद लवादाने जो अंतिम निवाडा दिला त्यात कर्नाटकाला 3.9 टीएमसी फिट पाणी कळसा-भांडुरा प्रकल्पांद्वारे मलप्रभेच्या पात्रात वळवण्यास अनुमती दिलेली आहे. परंतु लवादाच्या निकालाविरुद्ध तिन्ही राज्ये सर्वोच्च न्यायालयात गेली आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकाच्या कळसा, हलतरा, सुर्ला तसेच भांडुरा नाल्यांतले पाणी वळवण्यासाठी धरणांचे तसेच कालव्याच्या प्रकल्पांच्या सुधारित आराखड्यांना मान्यता दिल्याने या प्रकरणामुळे गोवा आणि कर्नाटकांत रणधुमाळी उडालेली आहे.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात कर्नाटकने घाटमाथ्यावरच्या चोर्लात हलतरा धरण प्रकल्पाची उभारणी केल्यावर विर्डीतल्या धरण प्रकल्पाला पाणी उपलब्ध होणार नसल्याचा मुद्दा चर्चेला आणलेला आहे.

एका बाजूला कर्नाटक हलतरा तर महाराष्ट्र विर्डी धरणाचे बांधकाम पुढे रेटण्यासाठी प्रयत्न करीत असून गोव्यातल्या साखळी आणि पोडोसे जल शुद्धीकरण प्रकल्पाला भेडसावणारी पाण्याची समस्या कशी सोडवणार, याचा सरकारकडे सध्या कोणताच आराखडा उपलब्ध नाही.

कणकुंबीतल्या रामेश्‍वर मंदिर परिसरात उगम पावणारी कळसा; कणकुंबी, चोर्ला, हुळंद, पारवाड येथील पाणी घेऊन सुर्लात बाराजणांच्या धबधब्याच्या रूपात प्रवेश करते. या नाल्याचे उगमापासून 3-4 किमीचा प्रवाह आणि पात्रच कर्नाटकाने 2006 पासून मोठ्या प्रमाणात आरंभलेल्या कालव्याच्या खोदकामामुळे उद्‍ध्वस्त केलेले आहे.

त्याजागी मलप्रभेत पाणी नेण्यासाठी बांधकाम केल्याने सध्या पावसातले गोव्याकडे येणारे पाणी कर्नाटकात वाहत आहे.

लवादाने आणि केंद्रीय जल आयोगाने कळसा, हलतरा आणि भांडुरा प्रकल्पांद्वारे ३.९ टीएमसी फिट वळवण्याच्या सुधारीत अहवालाला मान्यता दिल्याने, कर्नाटक नव्या उत्साहाने म्हादई खोऱ्यातले पाणी मलप्रभेच्या खोऱ्यात नेणार आहे आणि त्यासाठी कणकुंबी चोर्लाआणि नेरसे येथील पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रात धरणांची उभारणी करणार आहे.

तीन धरणे, महाकाय भुयारी आणि उघडे कालवे यांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर गोव्याकडे येणारे गोड्यापाण्याचे प्रमाण कमी होणार आहे आणि त्याचे गंभीर दुष्पपरिणाम येथील मत्स्य आणि जलचरांच्या पैदाशीवर होणार आहे.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञाने 2008 साली सादर केलेल्या शोधनिबंधातून गोड्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह धरणांद्वारे बंदिस्त केल्यावर समुद्रातला खारटपणा वाढून त्याचे दुष्परिणाम तेथील मत्स्य पैदाशीबरोबर एकंदर पर्यावरणीय परिसंस्थेवर कसे होणार याचा ऊहापोह केलेला आहे.

समुद्राला मिळणारे गोड्या पाण्याचे प्रवाह धरणाने बंदिस्त झाल्याने भारतातल्या बऱ्याच किनारपट्टीवरच्या प्रदेशातल्या मत्स्यसंपदेवरती प्रतिकूल परिणाम उद्‍भवलेले आहेत.

Kalasa Banduri project
Vasco: स्कूबा डायव्हिंग करताना पर्यटकाचा दुर्देवी मृत्यू
  • हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ 2001 पासून प्रकर्षाने भारतात जाणवत असून, पश्‍चिम किनारपट्टीवरच्या गोव्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

    एका जिल्ह्यापेक्षा भौगोलिक आकाराने छोट्या असलेल्या गोव्यासाठी सर्वाधिक गोडे पाणी पुरवणारी म्हादईसारखी जीवनदायिनी नसल्याने, कळसा-भांडुरासारखे प्रकल्प इथल्या वाढत्या लोकसंख्येसमोर पेयजलाची गंभीर समस्या निर्माण करणार आहे.

  • दमट हवामान आणि एकंदर वाढती क्षारता इथल्या प्राणीमात्रांचे जीवन त्रस्त करणार आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या प्रस्तावित धरणांद्वारे इथल्या लोकांना आणि प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे.

    गोमंतकीय लोकमानसाने निर्माण झालेले हे नैसर्गिक आणि कृत्रिम संकट दूर करण्यासाठी सर्व ताकदीबरोबर कायदेशीर लढाई सशक्त करण्यास सिद्धता ठेवणे महत्त्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com