गोवा इंटेलिजेंट सिटी मॅनेजमेंटपुढे आव्हान

वाढीव मुदत संपली तरी कामे अर्धवटच
GICMS
GICMSDainik Gomantak

पणजी: पणजी शहरात इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) अंतर्गत विविध कामे करण्याची जबाबदारी गोवा इंटेलिजेंट सिटी मॅनेजमेंट सिस्टमकडे (जीआयसीएमएस) होते. या कंपनीची काम करण्याची मुदत संपली असून, आता पुन्हा कंपनीला मुदत मागावी लागणार आहे. ( panaji city development limited even though the extended period is over, the works are still half done )

GICMS
मालमत्तेची माहिती न दिलेल्या लोकप्रतिनिधींची नावे प्रसिद्ध करणार

मिळालेल्या माहितीनुसार जुलै अखेरपर्यंत आखून दिलेली कामे पूर्ण झाली नाहीत असे संबंधित यंत्रणेला दिसून आले आहे. तसेच पणजी शहरातही अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामूळे नागरिकांसह देश - विदेशातून येणाऱ्या पर्यटकांवर याचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष परिणाम होणार आहेत. त्यामूळे ही कामे वेळेत पुर्ण झाल्यास या सर्वांची त्रासातून सुटका होणार आहे.

GICMS
National Night Out 2022: गोव्याचे हे समुद्रकिनारे नाईट लाइफसाठी सर्वोत्तम

केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत 180 कोटी रुपयांची कामे असून, आता ती ऑगस्टच्या पंधरावड्यापर्यंत पूर्ण होतील, असे दिसते. त्यासाठी आणखी काही दिवस मुदतवाढ ‘जीआयसीएमएस’ मागणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, वाहतूक नियंत्रण ठेवणारी यंत्रणा, पाणी, वीज, पर्यावरणीय सेन्सर अशा सर्व यंत्रणा उभारण्याचे काम ‘जीआयसीएमएस’ करीत आहे.

यापूर्वी, एप्रिल महिन्यात मुदत संपल्याने जुलैपर्यंत ती वाढविण्यात आली होती. परंतु जुलैमध्येही आता ते काम पूर्ण न झाल्याने पुन्हा मुदत वाढीशिवाय कंपनीपुढे पर्याय नाही, असे सूत्रांनी सांगितले.

समग्र शिक्षणाचा सरकारकडून बट्ट्याबोळ

पणजी: राज्यातील समग्र शिक्षा अभियान राबविण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे ताशेरे हल्लीच महालेखापालांच्या (कॅग) अहवालात ओढण्यात आले आहे. या अभियानाची सरकारने पद्धतीशीरपणे कार्यवाही न केल्याने राज्यातील मुलांचे भवितव्य अंधकारमय असून शैक्षणिक क्षेत्राचा बट्ट्याबोळ केल्याचा सनसनाटी आरोप गोवा फॉरवर्डने केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com