मालमत्तेची माहिती न दिलेल्या लोकप्रतिनिधींची नावे प्रसिद्ध करणार

लोकायुक्तांची नोटीस : माजी आमदारांसह अनेकांचा समावेश
Goa Lokayukta
Goa LokayuktaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : गोवा लोकायुक्तांनी तीन माजी आमदार, शहर महापौरांसह नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शेकडो प्रतिनिधींनी 2021 - 22 या वर्षासाठी त्यांची मालमत्ता आणि दायित्वे दाखल करण्यात अयशस्वी ठरले असल्याने त्यांची नावे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातची नोटीस गोवा लोकायुक्तने 27 जुलै 2022 रोजी जारी केली आहे.

गोवा लोकायुक्तने जारी केलेल्या या नोटिशीत सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रांसिस सिल्वेरा, सांताक्रुझचे माजी आमदार आंतोनिओ ऊर्फ टोनी फर्नांडिस व सांगेचे माजी आमदार प्रसाद गावकर यांच्यासह महापौर रोहित मोन्सेरात तसेच विविध पालिकांचे बहुसंख्य नगरसेवक, पंचायत सदस्य व जिल्हा पंचायत सदस्यांचा समावेश आहे. त्यांनी कार्यालयात ताबा घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत दर 5 नोव्हेंबरला ही माहिती देणे सक्तीचे आहे.

Goa Lokayukta
‘ग्रेटर पणजी’ अखेर निकालात

गेल्या आठवड्यात जारी केलेल्या नोटीशीमध्ये लोकायुक्त संस्थेचे निबंधक शिवदास गावणेकर यांनी नमूद केले आहे की, गोवा लोकायुक्त कायदा 2011 च्या कलम 21(1) नुसार लोकप्रतिनिधींनी 31 मार्च 2021 हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत मालमत्तेची माहिती सादर करणे आवश्‍यक होते. मात्र ते सादर करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर 18 एप्रिल 2022 रोजी हा अहवाल संबंधित अधिकारिणीकडे पाठवण्यात आला होता. या सर्वांना अधिकारिणीतर्फे नोटीसा बजावण्यात आल्या, तरी त्यांनी 25 जुलै 2022 पर्यंत माहिती सादर केली नाही. त्यामुळे अधिकारिणीने 27 जुलै 2022 रोजी नोटीस जारी करून या लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करून प्रसिद्ध करण्याचा निर्णय या कायद्यानुसार घेतला असल्याचे नोटिशीत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Mahaaghadi Latest News
Bicholim Broiler Chicken Price Hike
Goa Bhandari Community Politics
Scheduled Tribes Of Goa Demand
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com