एसीजीएल कंपनीच्या स्टोअर विभागाला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला 6 तासांचा कालावधी लागला.
Company
CompanyDainik Gomantak
Published on
Updated on

भुईपाल-सत्तरी येथील एसीजीएल कंपनीच्या स्टोअर विभागाला रविवारी मध्यरात्री आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला 6 तासांचा कालावधी लागला. आगीचे निश्चित कारण अजूनपर्यंत समोर आले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Goa News Update)

Company
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आज गोवा दौऱ्यावर

एसीजीएल कंपनीच्या स्टोअर विभागाला रात्री 1 वा.च्या सुमारास आग लागल्याची माहिती वाळपई अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) यंत्रणेला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, आग एवढी प्रचंड होती की स्टोअर विभागाचे सर्व सामान जळून खाक झाले असून इतर सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीमध्ये (Fire) कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नुकसानीचा निश्चित आकडा अजूनपर्यंत समोर आलेला नाही.

Company
थिवीत नीळकंठ हळर्णकर ‘बॅक फूट’ वर? कविता कांदोळकरांचे तगडे आव्हान

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची घटना कंपनीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलेली आहे. वाळपई, डिचोली (Bicholim) व ओल्ड गोवा फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी चांगल्या प्रकारचे योगदान दिल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास यश प्राप्त झाले. दोन दिवसांमध्ये नुकसानीचा निश्चित आकडा स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com