IRCTC च्या Goa Retreat पॅकेजमधून अनुभवता येईल अविस्मरणीय टूर; जाणून घ्या तपशील...

आत्तापर्यंत IRCTC ने विविध ठिकाणांहून गोवा टूर पॅकेजिस सुरू केली आहेत.
IRCTC Goa Packages
IRCTC Goa PackagesDainik Gomantak
Published on
Updated on

IRCTC Goa Tour Package - Goa Retreat: गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. त्या पार्श्वभुमीवर गोव्याकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. तसेच अनेक टूर नियोजन करणाऱ्या कंपन्याही सक्रीय झाल्या आहेत.

विविध टूर पॅकेजमधून गोव्याला जाऊ इच्छिणाऱ्यांना आकर्षित केले जात आहे. यात रेल्वेची IRCTC कंपनीही मागे नाही.

IRCTC ने आत्तापर्यंत देशभरातील विविध ठिकाणांहून गोव्यासाठीची अनेक टूर पॅकेजिस जारी केली आहेत. आता, IRCTC ने त्यात आणखी एका पॅकेजची भर घातली आहे.

Goa Retreat असे या पॅकेजचे नाव आहे. गोव्यातील सुंदर ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर हे पॅकेज लाभदायी ठरू शकते.

IRCTC Goa Packages
Vishwajit Rane: नवजात बालकांची 72 तासांत 5 आजार, 46 विकार तपासण्यासाठी चाचणी करणार; आरोग्यदायी राज्यासाठी पाऊल

फ्लाईट टूर पॅकेज

IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव GOA RETREAT आहे. त्याचा पॅकेज कोड SHA03 असा आहे. या पॅकेज अंतर्गत प्रवास करताना अनेक सुविधा मिळत आहेत. हे टूर पॅकेज एकूण 3 रात्री आणि 4 दिवसांचे आहे. हे IRCTC चे फ्लाइट टूर पॅकेज आहे.

प्रारंभ

याची सुरवात 30 नोव्हेंबर 2023 रोजी हैदराबाद येथून होईल. फ्लाईटने गोव्यात आल्यावर तिथून बसने प्रवास होईल.

IRCTC Goa Packages
CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी केले मध्य प्रदेशातील कार्यकर्त्याच्या घरी भोजन

नाश्ता-जेवण, निवास व्यवस्था

या टूर पॅकेज अंतर्गत प्रवास करताना तुमचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सर्व व्यवस्था केली जाईल. याशिवाय तुमच्या राहण्याची व्यवस्थाही केली जाईल.

शुल्क

तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 27,560 रुपये भाडे द्यावे लागेल. दोन लोकांसाठी तिकीटदर प्रति व्यक्ती 21,930 रुपये इतका आहे. जर तुम्ही तीन लोकांसह प्रवास करत असाल तर तुमचे प्रति व्यक्ती भाडे 21,805 रुपये होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com