Lairai Devi Jatra Utsav : शिरगावमधील ‘धोंडांची तळी’चा विकास; गैरसोय मिटली

धोंडभक्तांकडून समाधान; तळीला मोठा इतिहास
Dhond Tali
Dhond TaliDainik Gomantak
Published on
Updated on

शिरगाव येथील पवित्र ‘धोंड तळी’चा विस्तार आणि सुशोभीकरण करण्यात आल्याने यंदापासून धोंड भक्तगणांची चांगली सोय झाली आहे. श्री लईराई देवीच्या जत्रा काळात हजारो धोंड भक्तगण शुचीर्भुत होतात. जत्रेच्या पार्श्वभूमीवर सध्या वेगवेगळ्या भागातील व्रतस्थ धोंड भक्तगण या पवित्र तळीत स्नान करण्याचा घेत आहेत.

श्री लईराई देवीचे हजारो धोंड भक्तगण जत्रेदिवशी ज्या पवित्र ‘तळी’त स्नान करतात, त्या तळीला दोनशेहून अधिक वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे.

तत्पूर्वी तेथून जवळच असलेल्या ‘कासवाची पेठ’ या तळीवर जत्रेच्या दिवशी धोंड भक्तगण शुचीर्भुत होत असत. खाण व्यवसायामुळे शिरगावमधील नैसर्गिक जलस्रोत नामशेष झाले असताना ‘धोंडांच्या तळी’चे अस्तित्व मात्र शाबूत आहे. यावरून श्री लईराई मातेच्या अगाध लीलेचा प्रत्यय येत आहे.

Dhond Tali
Ponda Municipal Council Election : पुनर्रचनेनंतर बाजारापासून दूर गेलेला प्रभाग 11; नगराध्यक्षांचा प्रभाग

तळी पडत होती अपुरी

यापूर्वी ‘धोंडांच्या तळी’चा आवाका जवळपास 100 चौरस मीटर एवढा होता. गोव्यासह अन्य राज्यात मिळून सद्यस्थितीत श्री लईराई देवीच्या व्रतस्थ धोंड भक्तगणांचा आकडा चाळीस हजारांहून अधिक आहे. दरवर्षी त्यात वाढही होत असते.

जत्रेच्या दिवशी श्री लईराई देवीच्या चरणांकडे येणारे हजारो धोंड भक्तगण या पवित्र तळीत स्नान करतात. धोंडांबरोबर येणारे अन्य भक्तगणही या तळीत हातपाय धुऊन शुचिर्भूत होतात. जत्रेच्या दिवशी तळीवर उसळणाऱ्या गर्दीमुळे ही तळी अपुरी पडत होती.

"जागा उपलब्ध होताच, या तळीचा विस्तार आणि सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी स्थानिक पंचायतीतर्फे जलस्रोत खात्याकडे पाठविण्यात आला होता. विद्यमान आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पुढाकार घेऊन हा प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि एकदाची धोंड भक्तगणांची स्वप्नपूर्ती झाली."

- भगवंत गावकर, माजी सरपंच, शिरगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com