Girish Chodankar : काँग्रेसमध्ये गद्दारांनी घातले निष्ठेचे श्राद्ध!

मागील पक्षांतरावरूनही घेतला नाही धडा; गिरीश चोडणकर यांचं वक्तव्य
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

Girish Chodankar : हिंदू धर्मानुसार सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. आपल्या पक्षनिष्ठेचे गद्दार आमदारांनी श्राध्द घातले आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या या विश्वासघातकी नेत्यांना जनता कदापि माफ करणार नाही. मागील पक्षांतरात सहभागी झालेल्यांवर आज घरी बसण्याची वेळ आली आहे. यातून त्यांनी काहीच धडा शिकलेला नाही, अशी टीका काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात चोडणकर म्हणाले की, दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये गेलेल्या आठ काँग्रेस आमदारांनी जनतेचा आणि देवदेवतांचा विश्वासघात केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना पवित्र झाल्यासारखे वाटले असेल; पण जनता त्यांना माफ करणार नाही. ‘पक्षांतर करणार नाही’, अशी शपथ विधानसभा निवडणुकीपूर्वी या नेत्यांनी घेतली होती. विश्वास ठेवून लोकांनी त्यांना मते दिली आणि ते जिंकले. मात्र, याच मतदारांचा अपमान या आमदारांनी आता पक्षांतर करून केला असल्याचे चोडणकर म्हणाले.

ज्या पक्षाने मोठे केले त्याचा आणि मतदारांचा विश्वासघात करून भाजपमध्ये गेलेल्या फुटिरांना देव देवता आणि जागरूक जनता धडा शिकविल्याशिवाय राहाणार नाही. या प्रकारामुळे देवाला मानणारे लोकही रोष व्यक्त करतात. आम्ही आजपर्यंत देवाला सर्वोच्च मानले आहे. कदाचित या आमदारांना सध्या भाजपच सर्वोच्च वाटत असेल, असे लोक म्हणतात. राज्यात काँग्रेस निष्ठावान राजकीय नेत्यांची नव्याने फळी उभी करेल, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला आहे.

Girish Chodankar
Goa MLA Couples : गोव्यात एकाच पक्षात तीन आमदार दाम्पत्ये

पार्सेकरांची अवस्था लक्षात घ्या!

भाजप ही पवित्र गंगा असून, तिच्यात येणारा प्रत्येकजण पवित्र होतो, असे उद्गार काढणारे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची अवस्था भाजपने काय केली आहे, हे सारा गोवा जाणतो, असा टोलाही चोडणकर यांनी हाणला.

आमोणकरांवरही आगपाखड

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्यावरही चोडणकर यांनी रोष व्यक्त केला. कॉंग्रेसने विश्वास ठेवून तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली आणि भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले. तरीही त्यांनी विश्वासघात केला, असे चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com