साखळीच्या 'या' प्रभागांतील लढतींकडे सर्वांचे लक्ष, बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागलीय पणाला

तीन नवीन उमेदवार ः पाच आजी-माजी व अनुभवी नगरसेवक
Sanquelim Municipal Election 2023
Sanquelim Municipal Election 2023Dainik Gomantak

Sanquelim Municipal Election 2023 साखळी नगरपालिका निवडणुकीत चार प्रभागांमध्ये होत असलेल्या थेट लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या लढतील साखळीतील बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. त्यामुळे या लढती अत्यंत लक्षवेधी ठरणार आहेत.

या चार प्रभागांमध्ये पाच आजी-माजी नगरसेवक तर तीन नवीन उमेदवार रिंगणात आहेत. भाजप व टुगेदर फॉर साखळी या दोन्ही गटांमध्ये या प्रभागांसाठी बरीच रस्सीखेच चालू आहे.

नगरसेवक विरूद्ध युवतीमध्ये लढत

प्रभाग क्र. 9 मध्ये नगरसेवक व भाजपचे अत्यंत जुने व सक्रिय कार्यकर्ते आनंद काणेकर यांना एका युवतीने आव्हान दिले आहे. प्रवीण ब्लेगन यांची कन्या भाग्यश्री ब्लेगन हे टुगेदर फॉर साखळी या गटातर्फे निवडणूक लढत आहे.

नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांच्या अनुभवाच्या व जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी आपल्या प्रचाराला जोर दिला आहे. तर भाजपचे आनंद काणेकर यांनी आपल्या पध्दतशीर प्रचाराच्या सर्व फेऱ्या पूर्ण करून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Sanquelim Municipal Election 2023
Sanquelim Municipal Election 2023 उमेदवार निवडून येण्यासाठीच विरोधी गटाकडून दडपण -दंडेलशाहीचा वापर

नगरसेवक विरुद्ध नगरसेवक

प्रभाग क्र. 10 मध्ये मागील दोन वेळा नगरसेवक बनलेले दयानंद बोर्येकर यांच्यासमोर नगरसेवक राजेंद्र आमेशकर यांचे आव्हान आहे.

दयानंद बोर्येकर हे या प्रभागात हॅट्ट्रिक साधण्यासाठी रिंगणात उतरले आहे. त्यांना चांगला पाठिंबा लाभत आहे. तर टुगेदर फॉर साखळीचे राजेंद्र आमेशकर यांनीही आपल्या प्रचाराला बराच जोर दिला आहे.

नवख्या उमेदवारांत लढत

प्रभाग 11 हा ओबीसी महिलांसाठी राखीव प्रभाग असल्याने या प्रभागात दोन नवीन महिला उमेदवार रिंगणात आहेत. भाजपतर्फे दिपा जल्मी तर टुगेदर फॉर साखळीतर्फे रश्मी घाडी हे उमेदवार रिंगणात आहेत.

दोन्ही स्थानिक उमेदवार असल्याने प्रभागातील लोकांशी स्थानिक पातळीवर असलेल्या संपर्काच्या जोरावर त्यांचा प्रचार सुरू आहे. दोघांनीही विजयाची खात्री व्यक्त केली आहे.

Sanquelim Municipal Election 2023
एनआयआरएफ रँकिगनुसार देशातील टॉप 60 मध्ये आहे गोव्यातील 'हे' कॉलेज, आता मिळाले अ‍ॅक्रेडिएशन

सुनिता वेरेकर रिंगणात

साखळीतील प्रभाग क्र. 3 या हाऊसिंगबोर्ड प्रभागात भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या युवा उमेदवार सिध्दी प्रभू या रिंगणात आहेत. त्यांना माजी नगराध्यक्ष सुनिता वेरेकर यांनी आव्हान दिले आहे.

या प्रभागात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे घर असल्याने साखळीबरोबरच हा प्रभागही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. टुगेदर फॉर साखळीच्या सुनिता वेरेकर यांनीही आपल्या अनुभवाचा वापर करत प्रचारावर भर दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com