गोव्यातील प्रत्येकाला विविध सवलतींचा लाभ देणार; डॉ.सावंत

वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा घेतल्यास जवळजवळ १४९२ उपक्रम स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत सरकारने राबवले. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: स्वयंपूर्ण गोवा (Goa) हा एक वर्षांपूर्वी आपल्या सरकारने (Government) सुरू केलेला उपक्रम (Venture) गोव्यातील नागरिकासाठी उपयुक्त ठरत असून हा उपक्रम पुढील पाच वर्षे राबवून राज्यातील प्रत्येक नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ देतानाच त्यांना विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील. वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा घेतल्यास जवळजवळ १४९२ उपक्रम स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत सरकारने राबवले. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

CM Pramod Sawant
गोमेकॉत लवकरच सुरु होणार तीन नवे अभ्यासक्रम: विश्‍वजीत राणे

मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील स्वयंपूर्ण मित्र व सरपंचाना संबोधित केले .यावेळी समाज कल्याण खात्याचे मंत्री मिलिंद नाईक मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की स्वयंपूर्ण मित्र उपक्रमाअंतर्गत सरकारचे गॅझेटेड अधिकारी दर शनिवारी पंचायतीमध्ये जातात आणि तेथे लोकांना सरकारी योजनांची माहिती देतानाच प्रत्येक नागरिक स्वयंपूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करतात. शेतकऱ्यांना कृषी कार्ड ,किसान क्रेडिट कार्ड देणे, नागरिकांना हेल्थ कार्डचे वितरण करणे ,दूध उत्पादन वाढावे ,भाजी उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये जागृती करणे, दिव्यांगांना विविध उपकरणांचे वितरण करणे. नागरिकांना सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी पूर्ण सहकार्य करणे.

CM Pramod Sawant
कोरोनाचा कोकण रेल्वेला महामंडळाला 360 कोटींचा फटका

आदी कामे स्वयंपूर्ण मित्र करत आहेत. शौचालय, हर घर जल, वीज, रस्ते आदीसह सरकारच्या गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, दीनदयाळ स्वास्थ्य योजना या सर्वांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठीही स्थानिक पंच व सरपंच यांच्या सहकार्याने स्वयंपूर्ण मित्र प्रयत्न करत असून गोवा मुक्तीनंतरचा हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम असून गोव्याच्या मुक्तीला साठ वर्षे पूर्ण होत असतानाच तो राबवण्याचे भाग्य आपणास मिळाले आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले. १९ डिसेंबर २०२१ रोजी प्रत्येक तालुक्यातील एक स्वयंपूर्ण मित्र, एक पंचायत आणि एक लाभार्थी यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे सांगून ५० लाखाचे लाख खर्चाचे प्रकल्प ९० पंचायतींना मंजूर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातील स्वयंपूर्णमित्र, सरपंच आणि लाभार्थी यांच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार असल्याचे सांगून गोवा राज्य डबल डोस शंभर टक्के पूर्ण करणारे पहिले राज्य या महिन्याच्या शेवटपर्यंत ठरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

goa burglaries festive season crime news
bicholim marigold flower cultivation
honda gram sabha mining opposition
verna police station Sexual Assault case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com