Bicholim Municipal Council: चतुर्थीतही करतात निष्ठेने कर्तव्यपूर्ती; दहा ट्रक कचऱ्याची विल्हेवाट

डिचोलीतील पालिका कर्मचाऱ्यांची सेवा
Bicholim Municipal Council Workers
Bicholim Municipal Council WorkersDainik Gomantak

Bicholim Municipal Council Workers: एका बाजूला सर्वत्र चतुर्थीचा उत्साह असताना, डिचोली शहरात पालिकेचे सफाई कामगार चतुर्थीची उमेद मनातच ठेवून आपले कर्तव्य निष्ठेने बजावत असल्याचे दिसून आले. चतुर्थीवेळी विक्रेत्यांनी बेशिस्तपणे टाकून दिलेले माटोळीचे साहित्य आणि इतर कचऱ्यामुळे बाजारात प्रचंड प्रमाणात कचरा साचला होता.

जेसीबी यंत्राच्या सहकार्याने चतुर्थीच्या पूर्व रात्रीपासून ही विशेष स्वच्छता मोहीम सुरू असून, गेल्या तीन दिवसांत दहाहून अधिक ट्रक कचऱ्याची उचल करण्यात आली.

Bicholim Municipal Council Workers
Margao New Market: पदपथावरील विक्रेत्यांमुळे मडगाव न्यू मार्केटमधील व्यापारी त्रस्त

८० टक्के कचरा हटवला

शिल्लक राहिलेले माटोळीचे साहित्य विक्रेत्यांनी तसेच टाकून दिले. त्यामुळे कचऱ्याच्या राशी साचल्या आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत जवळपास ८० टक्के कचरा हटविण्यात कामगारांना यश आले. बाजारात साचलेला संपूर्ण कचरा उचलण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

असंवेदनशील विक्रेते

माटोळीचा कचरा विक्रेत्यांनी त्वरित पेट्यांमध्ये टाकला असता तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर ताण आला नसता. बाजारातील कचरा उचलण्याचे काम गेले तीन दिवस स्वच्छता कामगार करत आहेत. बुधवारी आठवडी बाजारामुळे या कामात व्यत्यय आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com