Dona Paula: दीड वर्षांनंतरही 14 दुकाने बंदच

दोनापावलातील प्रकार: अपुऱ्या जागे अभावी दुकानदारांचा बहिष्कार
Dona Paula Shops
Dona Paula ShopsDainik Gomantak

Dona Paula Shops: दोनापावल जेटी जवळ उभारलेल्या १४ दुकानांवर स्थानिकांनी बहिष्कार घातला असून ही दुकाने अद्याप बंदच आहेत.

स्थानिक दुकानदारांच्‍या मते दुकानाची जागा अपुरी असल्यामुळे साहित्य ठेवणे, बसणे शक्य होत नाही. तसेच चारही बाजूने दुकाने उघडी असल्याने धंदा कसा करायचा, असा प्रश्‍न दुकानदारांना पडला आहे.

Dona Paula Shops
Sanjay School Porvorim: शेवटपर्यंत मृत्यूशी दिली झुंज! संजय स्कूलमधील 'त्या' दिव्यांग विद्यार्थ्याचा मृत्यू

स्थानिक दुकानदारांनी एका स्थानिक मंत्र्यांची भेट घेऊनही यावर अद्याप तोडगा येत नसल्याची माहिती दिली. दोनापावल जेटी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून येथे शेकडो पर्यटक रोज भेट देतात. पर्यटन हंगामात तर येथे बरीच गर्दी असते.

यामुळे स्थानिक दुकानदारांना कपडे, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आणि इतर वस्तू विकून चांगली कमाई होते. गेली अनेक वर्षे स्थानिक लोक येथे तंबूत धंदा करत होते.

दीड वर्षांपूर्वी सरकारने याच लोकांसाठी १४ छोटेखानी दुकाने उभारली. पण अपुऱ्या जागे अभाव या स्थानिकांच्या पसंतीस ही दुकाने न पडल्यामुळे ती दुकाने अद्याप बंदच आहेत.

Dona Paula Shops
Kadamba Transport: ‘कदंब’च्या पहिल्या 23 बसेस भंगारात !

स्थानिक दुकानदार महिला म्हणाली, दीड वर्षांपूर्वी सरकारने चहूबाजूंनी उघडी असलेली १४ दुकाने उभारली.

एका दुकानाच्या खोलीत चार दुकाने थाटायला सांगितली, पण प्रत्यक्षात जागाच अपुरी पडल्याने असे करणे शक्य होत नाही. याच कारणामुळे आम्ही ही दुकाने न वापरता तशीच ठेवली आहेत.

दुकानदारांचा प्रश्‍न सुटेल!

आणखी एक दुकानदार म्हणाले, या दुकानाविषयी एका स्थानिक मंत्र्याला भेटलो, सर्व माहिती दिली, पण अजूनही यावर काही तोडगा आला नाही.

या दुकानाच्या जागेत चार दुकाने थाटने अशक्य आहे. याचा संबंधितांनी विचार केल्यास दुकानदारांचा प्रश्‍न निकालात निघेल. त्यामुळे ग्राहक व दुकानदारांनाही लाभ मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com