'दिल की दूरी' कायमच फारूक अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत

तीन वेळा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असलेले अब्दुल्ला(Farooq Abdullah) म्हणाले की, " पंतप्रधानाचे हे विधान स्वागतार्ह होते परंतु लोकांची मने जिंकण्यासाठी तळागाळात कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.
Farooq Abdullah on PM  Narendra Modi’s all-party meet on J&K issue
Farooq Abdullah on PM Narendra Modi’s all-party meet on J&K issueDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) आणि जम्मू-काश्मीरच्या(Jammu Kashmir) मुख्य नेत्यांशी झालेल्या बैठकीच्या एक महिन्यानंतर, रविवारी राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला(Farooq Abdullah) यांनी म्हणाले की,त्या भेटीनंतर सुद्धा शेवटच्या पातळीवर काहीच बदल जाणवत नाही आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकांची मने जिंकण्याची आणि दिल्लीच्या अंतरावर असलेल्या 'दिल की दूरी' मिटवायची आहे, असे पंतप्रधानांनी 24 जून रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हे वक्तव्य केले असल्याचे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले आहे.

तीन वेळा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असलेले अब्दुल्ला म्हणाले की, " पंतप्रधानाचे हे विधान स्वागतार्ह होते परंतु लोकांची मने जिंकण्यासाठी तळागाळात कोणतेही प्रयत्न झाले नाहीत."लोकांना ताब्यात ठेवणे सुरूच आहे आणि मतभेद लोकांचा सहन केला जात नाही. आम्हाला शेवट पर्यंत होणारे बदल पाहायचे आहेत. आज भेटीच्या महिनाभरानंतरही आम्ही त्याची वाट पाहत आहोत."

Farooq Abdullah on PM  Narendra Modi’s all-party meet on J&K issue
'सण साधेपणाने साजरे करा' पंतप्रधानांची 'मन की बात'

तसेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी यांनी आश्वासने दिली पण विश्वास कमी झाला नाही आणि आता नेमका तोच विश्वास दिल्ली आणि श्रीनगरमध्ये कमी असल्याचे सांगत फारूक अब्दुल्ला यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवरच टीका केली असून खरतर बैठकीला मी जाणारच नव्हतो कारण या बैठकीने साध्य काही होणार नाही हे मला आधीच माहिती होते पण बैठकी पंतप्रधानांनी बोलावली असल्याने मी गेलो पण मला अपेक्षित तेच भेटल मात्र समाधान काही निघू शकले नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.

या सोबतच त्यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांना आपापसातले मतभेद विसरून लोकशाहीचे खांब अधिक दृढपणे उभे करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही केले आहे.

दरम्यान काहीदिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील 8 प्रमुख राजकीय पक्षांच्या 14 नेत्यांसोबत चर्चा केली होती .जवळपास साडेतीन तास चालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली होती .या सर्वपक्षीय बैठकीत माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah), महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एनएसए अजित डोवाल (Ajit Doval), केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com