केपेत साकारणार सुसज्ज बस स्थानक, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7 कामांचा शुभारंभ

बार्शे पंचायतीत 30 कोटींची आरडीए अंतर्गत विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्याच बरोबर केपे सारख्या दुर्गम भागात..
Babu Kavalekar

Babu Kavalekar

Dainik gomantak

Published on
Updated on

केपेत काराळे इथे अद्ययावत सुसज्ज कदंब बस स्थानक साकारणार आहे. त्याची पायाभरणी आज केपे इथे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या हस्ते झाली. याच बरोबर काराळी ते तिळामळ या रस्त्याच्या बाजूचे सुशोभीकरण आणि कुस्मण पुलाची पायाभरणीही झाली.

याच दिवशी बार्शे पंचायतीत (Panchayat) 30 कोटींची आरडीए अंतर्गत विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्याच बरोबर केपे सारख्या दुर्गम भागात रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला, तर केपेच्या अनेक शाळांमध्ये गरजेची उपकरणे यावेळी प्रदान करण्यात आली. तसेच बेतूल येथे नूतन पंचायत घराची यावेळी पायाभरणी करण्यात आली.

<div class="paragraphs"><p>Babu Kavalekar</p></div>
मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आमोणकरांनी सोडले उपोषण

केपेतील काराळी येथे केपे नगरातील कार्यक्रम पार पडला. यावेळी केपेच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, उपनगराध्यक्ष विलियम फर्नांडिस, झेडपी संजना वेळीप, नगरसेवक दयेश नाईक, अमोल काणेकर, चेतन हळदणकर, प्रसाद फळदेसाई, सरपंच आलूय आफोन्सो, जासिंता डायस, संजय वेळीप राजू सुखटणकर, वाहतूक खात्याचे उपसंचालक प्रल्हाद देसाई, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील, मुख्य अधिकारी मधू नार्वेकर आदि यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले की, कॉँग्रेस (Congress) मधून भाजपामध्ये (BJP) जाणे महत्वाचे होते. क्षेत्राचा आणि मतदार संघाचा विकास कॉँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे होणे श्यक्य नव्हते. 17 आमदार निवडून आल्यावर जी पार्टी सरकार घडवू शकत नाही, त्यांच्या बरोबर राहून राजकारण (Politics) कसे करणार असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यावेळी बोलताना म्हणाले. गेल्याच आठवड्यात 100 कोटींच्या वर विकासकामांची सुरवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केपेतच केली. असे उद्गार उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी यावेळी बोलताना काढले.

<div class="paragraphs"><p>Babu Kavalekar</p></div>
...तर मग ऑनलाइन मतदान का नकोय? डिजिटल इलेक्शनच्या मार्गात काय अडचणी

यावेळी बाबू कवळेकर 6000 मताधिक्याने निवडून आणूया असा निर्धार यावेळी माजी नगराध्यक्ष दयेश नाईक म्हणाले. केपेत कचरा प्रक्रिया प्रकल्प सर्वात आधी बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांच्या प्रयत्नांमुळे केपेत आल्याचे ते पुढे म्हणाले. अमोल काणेकर यांनी केपेच्या विकासाचा शिल्पकार बाबू कवळेकर असल्याची ग्वाही देत आपले भाषण केले. तसेच केपेत कोरोंना काळात बाबू कवळेकर प्रत्येकाच्या मदतीला धावून गेले असल्याचे काणेकर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com