Goa Politics: सिक्वेरांना पर्यावरण आणि कायदा खाते

Goa Politics: राजभवनवरून मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र
Alex Sequeira
Alex SequeiraDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना पर्यावरण, कायदा व न्याय, विधिमंडळ कामकाज तसेच बंदर कप्तान ही खाती देण्यात आली आहे. तशा आदेशावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी स्वाक्षरी केली आहे.

राजपत्रात तशी अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यांना पर्यावरण तसेच कायदा व न्याय खाते दिले जाईल आणि आजच खातेवाटप होईल, असे वृत्त ‘गोमन्तक’ने दिले होते.

Alex Sequeira
Goa Government: जाहिरातीनंतर दोन वर्षांनी लेखी परीक्षेचा घाट

माजी मंत्री नीलेश काब्राल यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम खाते तूर्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच असेल. मुख्यमंत्र्यांकडील बंदर कप्तान खाते त्याबदल्यात सिक्वेरा यांना देण्यात आले आहे.

सिक्वेरा यांनी पर्यावरणमंत्री म्हणून यापूर्वी काम केले आहे. रविवारी सिक्वेरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना खाती देण्यासाठी बुधवार उजाडावा लागला.

सोमवारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‍घाटनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व्यस्त होते. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या.

बुधवारी पहाटे तेलंगणच्या दौऱ्यावर निघण्याआधी त्यांनी खातेवाटपाची विनंती करणाऱ्या राज्यपालांना उद्देशून लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली. त्यानंतर राज्यपालांनी त्या पत्रातील मजकुराला मान्यता दिली असून सायंकाळी उशिरा तसे पत्र राजभवनवरून मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाले.

ती राजपत्रात प्रसिद्ध कऱण्यासाठी सरकारी मुद्रणालयाकडे पाठवण्यात येते. असाधारण अशा राजपत्रात ती प्रसिद्ध कऱण्यात येते. ते सोपस्कार रात्री उशिरापर्यंत करण्यासाठी सरकारी यंत्रणेची धावपळ सुरू होती.

Alex Sequeira
Goa Recruitment Scandal: अभियंते निवड : ‘ते’ उमेदवार त्या पदांसाठी पात्रही नाहीत!

‘त्या’ चर्चेला पूर्णविराम

मुख्यमंत्र्यांनी सिक्वेरा यांना तातडीने खातेवाटप न केल्याने ते खातेबदल करतील, अशी चर्चा रंगली होती. ‘मला खातेवाटपाबाबत विचार तरी करू द्या’, असे सूचक उद्‍गार मुख्यमंत्र्यांनी रविवारी राजभवनवर काढले होते.

त्यामुळे इतर कोणत्या मंत्र्याचे वजनदार खाते काढून सिक्वेरा यांना देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते.

विशेषतः साबांखा, वाहतूक किंवा वीज खाते यांची अदलाबदल होणार, अशीही चर्चा होती.

परंतु मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणताही धोका न पत्करण्याचे ठरवल्याने आपल्याकडील वजनदार बंदर कप्तान खाते सिक्वेरा यांना देत साबांखा तूर्त स्वत:कडे ठेवत खातेवाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

मूळ भाजपचे मंत्री आता दोनच

सिक्वेरा यांच्या समावेशामुळे सावंत मंत्रिमंडळात दिगंबर कामत यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातील चौघांचा समावेश झाला आहे. विश्वजीत राणे, रवी नाईक, बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, सुदिन ढवळीकर, आलेक्स सिक्वेरा हे कामत मंत्रिमंडळात होते.

उर्वरित सहापैकी रोहन खंवटे आणि गोविंद गावडे यांनी अपक्ष म्हणून यापूर्वी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. आता ते भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

माविन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर हे कॉंग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. या न्यायाने डॉ. प्रमोद सावंत मंत्रिमंडळात खुद्द मुख्यमंत्री आणि सुभाष फळदेसाई हेच मूळ भाजपचे असल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com