Nilesh Cabral: 'या' 4 ठिकाणी ध्वनी, धुळ प्रदुषण मोजण्यासाठी बसवणार यंत्रणा

पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी दिली माहिती
Nilesh Cabral
Nilesh CabralDainik Gomantak
Published on
Updated on

Nilesh Cabral: गोव्यातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होत असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरच या भागात ध्वनी प्रदुषण मोजण्याची यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनी दिली.

कुडचडे, दूधसागर, कोलवा व बागा या चार ठिकाणी राज्यात प्रथमच धूळ व आवाज प्रदूषण चाचणी नियंत्रण करणारी यंत्रे बसवण्यात आली आहेत.

कुडचडे रवींद्र भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्ष जसमीन ब्रागांझा, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, मंडळाच्या सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो, मंडळाचे सदस्य तथा नगरसेवक प्रदीप नाईक, जेएसडब्लूचे कॅ. अनुराग भाऊलींवल व इतर मान्यवर उपस्थित होते.

Nilesh Cabral
Ponda And Sanquelim Election: फोंडा, साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

निलेश काब्राल म्हणाले, प्रदूषण नियंत्रण सूचित करणारी ही यंत्रे बॉश कंपनीने भारतात तयार केली असून सीएसआर योजनेतून जेएसडब्लू फौंडेशनतर्फे ही मशिन्स देण्यात आली आहेत.

राज्यात आता खाण व्यवसाय सुरू होणार असून त्यानंतर धूळ व आवाज प्रदूषण किती होते हे या यंत्रामुळे अचूक कळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता या यंत्राद्वारे त्याची तीव्रता कळणार आहे व त्यावर उपाययोजना करण्यास मदत होणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

समुद्र किनाऱ्यावर ध्वनी प्रदूषण बरेच होते. यासाठी खाण भागात ही यंत्रे बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या यंत्रांचा नियंत्रण कक्ष गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस खाते व जिल्हाधिकारांच्या कार्यालयात असणार आहे.

Nilesh Cabral
Mahadai Water Dispute: कर्नाटकचे नाले प्रचंड मोठे, 'म्हादई'चे सर्व पाणी वळवण्याची भीती; माजी अधिकाऱ्याचा दावा

राज्यात होणाऱ्या लग्न समारंभावेळी उपजिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाकडून ध्वनी यंत्रणा बसविण्यासाठी तसेच मद्य वापर करण्यासाठी ना हरकत दाखले घ्यावे लागतात. यावर सुद्धा आता सरकार गंभीरपणे विचार करीत असून येणाऱ्या काळात लग्न समारंभ स्थळे तसेच सभागृहांनी असे ना हरकत दाखले पूर्वीच घ्यावे जेणेकरून लोकांचा वेळ वाचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com