Ponda And Sanquelim Election: फोंडा, साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

उद्या अर्ज माघारीचा अंतिम दिवस; उद्याच स्पष्ट होणार लढतींचे चित्र
Ponda And Sanquelim Municipal Council
Ponda And Sanquelim Municipal CouncilDainik Gomantak

Ponda And Sanquelim Municipal Council Election 2023: फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज, बुधवारी छानणी झाली. यात दोन्ही नगरपालिकांसाठी दाखल झालेले सर्व 118 अर्ज वैध ठरले.

काही उमेदवारांनी एकाहून अधिक अर्ज दाखल केले होते. असे 10 अर्ज बाजूला काढण्यात आले आहेत. म्हणजेच एकूण 108 अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. पैकी फोंड्यातील 52 तर सांखळीतील 56 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.

Ponda And Sanquelim Municipal Council
Miramar Accident: करंझाळे अपघात; अल्पवयीन चालवत होता 'ती' स्कॉर्पियो

उमेदवारी अर्ज भरण्याच्या काल, मंगळवारी शेवटचा दिवस होता. दोन्ही नगरपालिकांमधील 27 प्रभागांकरिता मिळून 118 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. फोंड्यातील 15 प्रभागांकरता एकूण 61 तर साखळी नगरपालिकेच्या 12 प्रभागांकरता एकूण 57 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

उद्या, गुरूवारी 20 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, साखळी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दृष्टीने साखळी नगरपालिका महत्वाची आहे. हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी उमेदवारांना 2 लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com