

पणजी: ‘इनफ् इज इनफ्’तर्फे शुक्रवार, १७ रोजी सकाळी १० वा. पणजीतील नगरनियोजन खात्याच्या कार्यालयासमोर सभा घेण्यात येणार आहे. नगरनियोजन कायदा कलम ‘३९-अ’ रद्द करणे, या कायद्यानुसार जमिनीचे रूपांतरण रद्द करणे व अन्य मागण्यांबाबत आंदोलनात सहभागी होणाऱ्या उपस्थित लोकांच्या सह्यांचे निवेदन मुख्य नगरनियोजकांना देण्यात येणार असल्याची माहिती देविदास आमोणकर यांनी दिली.
गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत आमोणकर बोलत होते. यावेळी गोविंद शिरोडकर उपस्थित होते. देविदास आमोणकर म्हणाले, या सभेसाठी आम्ही भाजपसह सर्व पक्षाच्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शांततेत आणि सर्व कायद्यांचे पालन करून होईल.
या सभेत यावेळी पर्यावरण अभ्यासक क्लॉड अल्वारिस व ‘इनफ् इज इनफ्'चे पदाधिकारी आपली भूमिका मांडतील. त्यानंतर आमचे शिष्टमंडळ मुख्य नगर नियोजकांना भेटून आपले निवेदन सादर करेल. अमोणकर पुढे म्हणाले की, आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, विकास शाश्वत असला पाहिजे. विकासाच्या नावे राज्यातील जमिनींचे रूपांतरण करणे योग्य नाही.
गोविंद शिरोडकर म्हणाले की, आमच्या चळवळीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील सहा महिन्यांत आम्ही सर्व तालुक्यांत चिंतन बैठका घेतल्या आहेत. गोव्याचे अस्तित्व संपवणारे कलम ‘३९-अ’ रद्द झालेच पाहिजे. याबाबत सरकारला जागे करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, आपली एकी दाखवली तरच सरकार भानावर येईल.
तुम्ही एक पाऊल टाका...
‘इनफ इज इनफ’ चळवळीचे संस्थापक व मार्गदर्शक माजी मुख्य न्यायाधीश फेर्दिन रिबेलो हे कौटुंबिक कार्यक्रमामुळे देशाबाहेर आहेत. त्यांनी शुक्रवारी (१७ जुलै) होणाऱ्या ‘टीसीपी’च्या कार्यालयासमोरील सभेपूर्वी राज्यातील जनतेसाठी व्हिडिओ क्लिपद्वारे आवाहन केले आहे. गोवा राखण्यासाठी जनेतेने या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. गोव्यासाठी तुम्ही एक पाऊल टाका, आम्ही मागे हटणारे नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.