पणजी: व नखात्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील पाच वर्षांसाठीचा व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आदेश वनमंत्री विश्वजित राणे यांनी वन अधिकाऱ्यांना दिलेत. खात्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज मंगळवारी वन भवनात अधिकाऱ्यांसोबत राणे यांनी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
राणे म्हणाले, ‘वन खात्यातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्याबरोबरच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी पाच वर्षांचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करा. ज्या आधारे वन विभागाच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल आणि वनांचे संरक्षणही होईल’. यावेळी वन विभागाशी संबंधित विविध फेस्टिवल आणि कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. याबरोबरच मंत्री राणे यांनी विभागीय परिक्षेत्र वन अधिकारी यांच्यासह निवृत्त वनअधिकाऱ्यांचीही विविध विषयांवर चर्चा केली. विभागाच्या सुधारणेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अनेक सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी केली जाईल असेही राणे यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.