गोवा, महाराष्ट्रात EDचे छापे, 175 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त

तब्बल 175 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी महाराष्ट्र आणि गोव्यात विस्तार असलेल्या एका पोलाद उद्योग समूहाच्या 44 हून अधिक केंद्रांवर Enforcement Directorate (ED) नुकतेच छापे घातले आहेत
Enforcement Directorate actions against on big still company in Goa and Maharashtra
Enforcement Directorate actions against on big still company in Goa and Maharashtra Dainik Gomantak
Published on
Updated on

तब्बल 175 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी महाराष्ट्र आणि गोव्यात विस्तार असलेल्या एका पोलाद उद्योग समूहाच्या 44 हून अधिक केंद्रांवर Enforcement Directorate (ED) नुकतेच छापे घातले आहेत . पुणे(Pune), नाशिक(Nashik), नगर (Nagar) आणि गोव्यात 25 ऑगस्ट रोजी प्राप्तिकरने कारवाई करत डिजिटल पुरावे तसेच रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत. (Enforcement Directorate actions against on big still company in Goa and Maharashtra)

या रकमेमध्ये आणखी वाढ होऊ शकते. बनावट चलनाच्या आधारे स्क्रॅप आणि स्पंज आयर्नची खरेदी दाखवून या उद्योगसमूहाकडून फसवणूक करण्यात आल्याचे आढळून आले आहे. ही बनावट चलने देणाऱ्यांच्या ठिकाणांवरही प्राप्तिकर खात्याने छापे टाकले आहेत . या कारवाईदरम्यान चलन देणाऱ्यांनी मान्य, केले की चलन दिल्यानंतरही मालाचा पुरवठा करण्यात आला नव्हता. एवढेच नव्हे तर बनावट खरेदी दाखवून जीएसटी इनपुट क्रेडीट वसुलीसाठी देखील बनावट ई-बिले तयार करण्यात आली.

Enforcement Directorate actions against on big still company in Goa and Maharashtra
Goa: सारमानस धक्क्यानजीक फेरीबोटीतून पडल्याने एकजण बुडाला

जवळपास 5 कोटींचे दागिने जप्त

या कारवाईत विविध ठिकाणांवरून तीन कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आणि सव्वा पाच कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून १९४ किलो चांदीच्या बेहिशोबी वस्तूही या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आल्या आहेत त्यांची किंमत सव्वा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. संबंधितांनी या वस्तूंची जबाबदारी स्वीकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com