Goa Government : गोमंतकीय युवकांचे सशक्तीकरण; परीक्षा पारदर्शकतेवर भर

Goa Government : योग्य आणि पारदर्शक निवड प्रक्रिया सुनिश्‍चित करण्यासाठी आयोग नोव्हें.डिसें. मध्ये समान परीक्षांचे आयोजन करणार आहे.
goa
goa Dainik Gomantak

Goa Government :

गोवा सरकारने गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन सादर केले असून त्यामुळे सरकारी पदांसाठी कर्मचारी निवड प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात आली आहे.

या पुढाकाराचा उद्देश निवड प्रक्रियेत सुधारणा करणे आणि नियमितपणा आणणे, भरती प्रक्रियेत सुसुत्रता आणि पारदर्शकता आणणे असा आहे. गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनने अलीकडे सरकारी खात्यांमध्ये पारंपरीक भरतीचा मार्ग बदलणारी पहिली अधिसूचना जारी केली.

या घोषणेमध्ये ६ खात्यांमधील ९ गटवारींमधील ३३ रिक्त पदांचा समावेश आहे. या सुधारीत पध्दतीनुसार विविध खात्यांमधील विशिष्ट सर्व पदांची वार्षिक जाहिरात देण्यात येईल, ज्यामुळे उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेत सुलभता आणली जाईल.

योग्य आणि पारदर्शक निवड प्रक्रिया सुनिश्‍चित करण्यासाठी आयोग नोव्हें.डिसें. मध्ये समान परीक्षांचे आयोजन करणार आहे. जीएसएससीची वापरण्यास मैत्रीपूर्ण वेबसाईट तीन भाषांमध्ये उपलब्ध असून दिव्यांगजनांच्या समावेशासाठी तिची रचना करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही वेबसाईट सर्वंकष व्यासपीठ आहे.

या वेबसाईटमध्ये जाहिरात दिलेल्या पदांचा अभ्यासक्रम,सरावासाठी मॉक चाचणी आणि आधीच्या प्रश्‍न पत्रिका पाहण्याची सुविधा , रोजगारेच्छुकांना परीक्षेची तयारी करण्यासाठीचे साहित्य यासह परिपूर्ण माहिती यांचा समावेश आहे.

goa
Goa Accident Case: नोकरीवरून घरी परतताना भरधाव कारची धडक

गोवा सरकारच्या या अभिनव पावलामुळे भरती प्रक्रियेचे आधुनिकीकरण तर झाले आहेच त्याचबरोबर समावेशकता आणि सुलभता तत्वे जोडली गेली आहेत. त्यामुळे पारदर्शक आणि उमेदवार मित्रत्व निवड प्रक्रियेचा नवीन प्रमाण स्थापित झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com