Pilerne Fire:…तर ‘बर्जर’ कंपनीचे स्‍थलांतर करणार

आगदुर्घटनेचा अभ्यास करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन केली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
Goa CM Pramod Sawant | Fire in Goa Paint Factory
Goa CM Pramod Sawant | Fire in Goa Paint FactoryDainik Gomantak

Pilerne Fire: पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील ‘बर्जर बेकर कोटिंग’ कंपनीला लागलेल्या आगदुर्घटनेचा अभ्यास करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन केली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. (Fire in Goa Paint Factory)

समितीने अहवाल दिल्यानंतर योग्य ती कार्यवाही सुरू केली जाईल. स्थानिकांसाठी ही कंपनी धोकादायक बनल्यास ती स्थलांतरित करण्यात येईल. गरज पडल्यास कारखान्याला दंडही ठोठावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी आज सभागृहात दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तर तासानंतर आमदार मायकल लोबो यांनी हा विषय लक्षवेधीमार्फत मांडला. ते म्हणाले, बर्जर कंपनीच्या फॅक्टरीला लागलेल्या आगीमुळे आजही स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आज पुन्हा या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. त्‍यामुळे ही फॅक्टरी अन्यत्र हलवावी,

राज्यातील सर्व उच्च जोखमीच्या उद्योगांचा सरकार आढावा घेणार आहे. यापुढे अशा प्रकारच्या उद्योगांना निवासी वस्तीजवळ परवानगी दिली जाणार नाही.

पिळर्ण येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेऊ. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com