PM-CM मीटिंगमध्ये 'या' गोष्टींवर भर; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

बैठकीमध्ये पंतप्रधानांनी सर्व राज्यातील कोरोनाच्या (Corona) परिस्थितीचा आढावा घेतला.
PM-CM Meeting
PM-CM MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

PM-CM Meeting: देशातील सर्व राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हर्चुअल चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी सर्व राज्यातील कोरोनाच्या (Corona) परिस्थितीचा आढावा घेतला.

PM-CM Meeting
काँग्रेस पक्ष एकटा भाजपला पराभूत करूच शकत नाही: महुआ मोईत्रा

या बैठकीमध्ये त्यांनी सर्व राज्याना काही मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. बैठकीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद (CM Pramod Sawant) सावंत यांनी मीडियाशी संपर्क साधला आणि आजच्या बैठकीबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, 'पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरणावर (Vaccination) भर देण्यास सांगितले आहे. खास करून 15 ते 18 वर्षे वयोगटातील लसीकरण वाढवण्यास सांगितले आहे. त्याबरोबर 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस (Booster Dose) देण्यात यावे असे ते म्हणाले.'

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, 'आर्थिकरित्या उद्योग-व्यापार बंद होणार नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गोव्यात आपण आधीच कोरोना रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी निर्बंध लावले आहेत. गोव्यातील पॉझिटिव्हिटी दर जरी जास्त असला तरी रुग्ण हॉस्पिटल मध्ये भारती होण्याचे किंवा आयसीयू (ICU) मध्ये जाण्याचे प्रमाण अगदी 1 टक्क्यावर आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ह 91 ते 92 टक्क्यांइतका जास्त आहे. त्यामुळे मी गोव्यातील जनतेला एकच विनंती आणि आवाहन करू इच्छितो की, या सर्व निर्बंधांचे जनतेने काटेकोरपणे पालन करावे, तरच कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cutbona jetty sanitation issues Goa
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com