Elliot Rosenberg: 40 देश फिरल्यानंतर अमेरिकन व्यावसायिक झाला गोव्यात स्थायिक! म्हणाला इथले किनारे, निसर्ग पाहून भारावून गेलो

Elliot Rosenberg Goa: इलियट आपली अमेरिकन ट्रॅव्हल आणि फायनान्स कंपनी चोपडे येथून चालवतो. 40 पेक्षा अधिक देशात प्रवास केल्यानंतर इलियटने ठरवले की आता स्थायिक होण्याची वेळ आली आहे.
Elliot Rosenberg Goa
Elliot Rosenberg GoaDainik Gomantak
Published on
Updated on

किंबर्ली कुलासो

पांढऱ्या पिकेटचे कुंपण असलेले आपले एक घर उपनगरात असावे, समृद्धी आणि संपन्नतेची भावना असावी आणि कॉर्पोरेट शिडीवर उंच चढावे हे अमेरिकेन स्वप्न भारतातील अनेक जण पाहतात आणि त्या स्वप्नाच्या शोधात ते अमेरिकेत स्थलांतरही करतात. पण मग काही असे लोक आहेत जे अधिक समाधानी आणि शांत जीवनाच्या शोधात ही ‘रॅट रेस’ नाकारतात.‌ इलियट रोजनबर्ग- एक अमेरिकन नागरिक हा त्यापैकीच एक आहे. 

इलियट 2024 मध्ये अमेरिकेतून भारतात आला आणि गोव्यातील चोपडे या गावात त्यांनी आपले घर वसवले. तो, योग प्रशिक्षक असलेली त्याची पत्नी वृंदा शर्मा आणि टोस्टी हा त्यांचा पाळीव कुत्रा (जो देखील अमेरिकेतून आणला गेला आहे) असे त्यांचे कुटुंब चोपडेत राहते.‌ इलियट आपली अमेरिकन ट्रॅव्हल आणि फायनान्स कंपनी चोपडे येथून चालवतो. 40 पेक्षा अधिक देशात प्रवास केल्यानंतर जेव्हा इलियटने ठरवले की आता स्थायिक होण्याची वेळ आली आहे, तेव्हा त्याने एका भारतीय स्त्रीशी लग्न केले, थोडासा भारत अनुभवला आणि अंती गोव्याला आपले घर मानले.

इलियाट सांगतो, 'पर्यटक असणे आणि गोव्याचा रहिवासी असणे हे दोन वेगळे अनुभव आहेत. जेव्हा मी पहिल्यांदा गोव्यात पर्यटक म्हणून आलो होतो तेव्हा गोव्याचा अविश्वसनीय निसर्ग आणि इथले सुंदर समुद्रकिनारे पाहून मी भारावून गेलो होतो. मी शाकाहारी असल्याने मला आवडणाऱ्या विविध पदार्थांसह गोव्यातील अनेक उत्कृष्ट चवदार पौष्टिक शाकाहारी रेस्टॉरंट्सचा मी अनुभव घेतला. गोव्याचा रहिवासी बनल्यानंतर मात्र ठराविक पर्यटन क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन मी गोव्याचा अधिक शोध घेऊ शकलो. समुद्रकिनाऱ्यांना पाठ करून गोव्याच्या अंतर्भागात गेल्यानंतर गोव्याची जी समृद्ध विविधता तुम्ही अनुभवता ती पर्यटक म्हणून अनुभवणे शक्य नसते.'

Elliot Rosenberg Goa
Goa Tourism: 'गोवा म्हणजे मौज मस्ती नव्हे! इथली खरी माणुसकी, संस्कृती ग्रामीण भागात'; तवडकरांनी मांडले रोखठोक मत

अमेरिकन संधींचे जग सोडून आलेल्या इलियटचा असा विश्वास आहे की गोव्यातील शांतता, इथली हिरवळ, इथल्या हवेची गुणवत्ता अगदी परिपूर्ण म्हणता येईल अशी नसली तरी भारतातील इतर ठिकाणांपेक्षा ती नक्कीच अधिक उजवी आहे. भारतातील ऋषिकेशमध्येही इलियट काही काळ वास्तव्य करून राहिला आहे. मात्र तेथील जनसमुदाय हा मुख्यतः यात्रेकरू असल्याने क्षणीक असतो आणि त्यांच्याशी एक समाज म्हणून जोडून घेणे कठीण असते. ऋषिकेश व्यतिरिक्त 7 वर्षे इलियटने मुंबईतही काढली आहेत. गोव्यातील समुद्र किनारे, गोव्याच्या अंतर्भागातील निसर्ग, संथ गतीचे इथले जीवन याचे म्हणूनच त्याला खूप कौतुक आहे. 

Elliot Rosenberg Goa
Goa Tourism: पूर्वी लोक गोव्याचे 'सृष्टिसौंदर्य' पाहण्यास येत, आता 'कशाला' येत आहेत? विशेष लेख

यूएसएमधील उपभोक्तावादाच्या असलेल्या दबावाबद्दल देखील इलियट बोलतो. तो म्हणतो, 'अमेरिका भांडवलशाहीचा बालेकिल्ला आहे मात्र आपला सांस्कृतिक आणि सामाजिक स्तर राखण्यासाठी त्यांना सतत चढाओढ करावी लागते. उदाहरणार्थ, मला माझ्या मित्रांच्या स्तरावर येण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील मात्र ते ईष्ट नसेल. एका स्तरावर पोहोचल्यानंतर मग तुम्ही पुढील पातळी गाठण्यासाठी धडपडता आणि अशाप्रकारे तुम्ही मग कायम एक प्रकारच्या ट्रेडमिलवर राहता.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com