Electrify Goa Rally: गोव्यात 'इलेक्ट्रिफाय गोवा' रॅलीचे आयोजन; दिवस, ठिकाण, उद्देश जाणून घ्या

भारताच्या G-20 अध्यक्षतेखाली गोव्यात चौथ्या 'एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन' मंत्रिस्तरीय बैठक होणार आहे.
Electrify Goa Rally 2023
Electrify Goa Rally 2023ANI
Published on
Updated on

Electrify Goa EV Rally 2023

भारताच्या G-20 अध्यक्षतेखाली गोव्यात चौथ्या 'एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन' मंत्रिस्तरीय बैठक होणार आहे. यात 22 जुलै (शनिवारी) रोजी 'इलेक्ट्रिफाय गोवा' रॅलीचे आयोजन केले जाईल. सरकारच्या वतीने याबाबत प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

'इलेक्ट्रिफाय गोवा' रॅलीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन (EV), धावपटू आणि सायकलस्वार एकत्र येतील. पणजीतील सांता मोनिका जेट्टीपासून सुरू होणारी रॅली बांबोळी येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर संमाप्त होईल. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

"ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE) आणि G-20 गोवा सचिवालय" यांच्या संयुक्त विद्ममाने रॅलीचे आयोजित करण्यात आले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, हरित भविष्याला चालना देणे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे हे या रॅलीचे उद्दिष्ट आहे.

Electrify Goa Rally 2023
Dudhsagar Waterfall Video: दूधसागर धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी! पण पोलीस आले अन् प्लॅन फिस्कटला; व्हिडिओ पहा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या रॅलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्यात अशाप्रकारची रॅली आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. गोवा नेहमीच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आला आहे. जगभरातील इच्छुकांना मी या रॅलीत सहभागी होण्यासाठी आमंत्रण देतो.

गोव्याचा निसर्गसंपन्न परिसर आणि नयनरम्य दृष्य इको फ्रेन्डली वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य आहे. असे वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com