Dudhsagar Waterfall Viral Video: पावसाळा सुरू होताच वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आपसूकच गोव्यातील धबधब्यांकडे वळतात. मात्र यंदा या पर्यटकांच्या मजामस्ती करण्याच्या प्लॅनवर पाणी फिरले आहे.
गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना जाण्यासाठी बंदी करण्यात आली असून यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटकांच्या गर्दीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
निसर्गाची अद्भुत किमया लाभलेला दूधसागर धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. यासाठी देशी पर्यटक गोव्यात दाखल झाले खरे, मात्र त्यांना गोवा पोलिसांनी धबधब्यावर जाण्यापासून रोखले.
मागील काही दिवसांपासून धबधब्यांच्या ठिकाणी होत असलेल्या अपघातांमुळे सध्या प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी म्हणून आलेले हे सर्व पर्यटक नाहक अडकून पडले. हजारोंच्या संख्येने गर्दी केलेला हा व्हिडिओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, हे पर्यटक यशवंतपूर आणि निजामुद्दीन एक्सप्रेसमधून दूधसागर रेल्वे स्टेशनवर दाखल झाले आहेत. धबधब्यावर जाता न आल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हापासून हे सर्व पर्यटक रेल्वे रुळावरच उभे आहेत. यामुळे ट्रेन आली तर मोठी दुर्घटना घटण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पर्यटकांना नियंत्रित करण्यासाठी लोंढा आणि वास्कोमधून अतिरिक्त पोलीस फोर्स मागवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात मागील काही दिवसांमध्ये धबधब्यांवर झालेल्या घटनांमुळे सरकारने अभयारण्यातील धबधब्यांवर प्रवेशबंदी केली आहे. तर अनेक ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूकही करण्यात आली आहे.
अनेक पर्यटक इथे येऊन दारू पिऊन पाण्यात उतरत असल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोणीही पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.