Paroda: पारोडा भागात भूमिगत वीजयंत्रणा कार्यान्वित; युरी आलेमाव यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन

Yuri Alemao: युरी आलेमाव यांनी वीजमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करीत हे काम करून घेतले
Yuri Alemao:  युरी आलेमाव यांनी वीजमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करीत हे काम करून घेतले
Yuri Alemao At ParodaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पारोडा व कोठंबी भागात झालेल्‍या भूमिगत वीज यंत्रणेचे आज विराेधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन करण्‍यात आले. शेल्‍डे वीज उपकेंद्रावरून ही यंत्रणा कार्यान्वित करण्‍यात आली. त्‍यामुळे पारोडा तसेच कोठंबी-अवेडे या भागातील वीज समस्‍या नियंत्रणात येणार असल्‍याचे सांगितले जाते.

पारोडा तसेच कोठंबी-अवेडे भागात विजेचा पुरवठा व्‍यवस्‍थित होत नसल्‍यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. ही समस्‍या दूर करण्‍यासाठी युरी आलेमाव यांनी वीजमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करीत हे काम करून घेतले.

Yuri Alemao:  युरी आलेमाव यांनी वीजमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करीत हे काम करून घेतले
Paroda Bridge : पारोडा येथील पूल तीन दिवस पाण्याखाली

या भागात जी भूमिगत वीज यंत्रणा सुरू केली हाेती तीही कार्यान्वित करण्‍यात आल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले. यापूर्वी आलेमाव यांच्‍या हस्‍ते चांदर येथील नवीन ट्रान्‍सफॉर्मरचे उद्‍घाटन करण्‍यात आले होते. यावेळी चांदरचे सरपंच आणि पंचसदस्‍य उपस्‍थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com