फातोर्डा: मडगाव परिसरात अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती वीज खांब असून काही खांबाखाली असलेलेल बॉक्सही उघडेच आहेत. त्यामुळे या खांबापासून नागरिकांना धोका उत्पन्न होऊ शकतो. तसेच हे खांब कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. ही धोकादायक यंत्रणा दुरूस्ती करण्याची मागणी, ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.
या ठिकाणी भूमिगत वीज यंत्रणा कार्यन्वित असून २००७ मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली होती, पण हे काम पाच वर्षांनी पूर्ण करण्यात आले. यावेळी फेकण्यात आलेली काही वीज उपकरणे मडगाव परिसरात जीर्णावस्थेत आहेत. वीज खात्याच्या या प्रकाराबाबत ग्रामस्थांत नाराजी निर्माण झाली आहे.
याबरोबरच काही विजेचे खांबही जीर्ण झाले असून त्यांना गंजही चढला आहे. हे खांब केव्हाही तुटून पडण्याची शक्यता आहे. असले प्रकार मडगाव मधील अनेक ठिकाणी दिसून येत असून या विषयी वीज खात्याने त्यांचा जागी दुसरे खांब टाकावे, असे येथील नागरिकांची मागणी आहे.
आके मडगाव येथील सुशांत नाईक म्हणाले, आपल्या घराशेजारी असलेली स्ट्रीट लाईटच्या खांबाला अर्ध्यावर गंज चढला आहे. तो केव्हाही मोडण्याची शक्यता आहे. सदर खांब रस्त्यावर धोक्याची शक्यता आहे.
कालकोंडा येथील दीपक गावकर म्हणाले, अनेक वीज खांब जीर्ण झाले आहेत. तसेच काही बॉक्सही उघडेच आहेत, त्यामुळे जनावरे किंवा ग्रामस्थांनाही ते धोक्याचे आहे.कोंब येथील एका रहिवाशाने सांगितले, कि या ठिकाणी वीज ट्रान्सफॉर्मरच्या वीज वाहिन्या खुल्या असल्याच्या स्थितीत असून त्यामुळे येथे कोणी चुकीने या तारांना स्पर्श केल्यास अनर्थ होण्याची शक्यता आहे.
वेळोवेळी दुरुस्ती: अभियंता
आके पॉवर हाऊस येथील वीज खात्यात सहाय्यक अभियंते असलेले कार्लूस फर्नांडिस म्हणाले, नादुरुस्त स्थितीत असलेली वीज उपकरणे बदलण्यात येत आहेत. जीर्ण झालेल्या ठिकाणी नवीन खांब टाकण्यात येत आहेत. तसेच वीज ट्रान्सफॉर्मेरचीही दुरुस्ती वेळोवेळी करण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.