Electric Scooter Fire Betim: चार्जिंगला लावलेली ईव्ही दुचाकी अचानक पेटली; कार आणि बुलेटचेही लाखोंचे नुकसान!

Electric Scooter Catches Fire in Betim Goa: रामनगर, बेती येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या ईव्ही दुचाकीला आग लागून ती जळून खाक झाली.
Electric Scooter Catches Fire in Betim Goa
Electric Scooter Fire BetimDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: रामनगर, बेती येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या ईव्ही दुचाकीला आग लागून ती जळून खाक झाली. या आगीची झळ शेजारी पार्क केलेल्या कार आणि बुलेट मोटारसायकललाही बसली. या दुर्घटनेत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ही घटना मंगळवारी (ता. २०) दुपारी १.२० च्या सुमारास रामनगर, बेती येथील आसरा इमारतीत घडली. हाजेकुल आलम यांनी आपली इलेक्ट्रिक दुचाकी पार्किंगमध्ये चार्जिंगला लावली होती. त्यावेळी अचानक शॉर्टसर्किट झाल्याने दुचाकीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही मिनिटांतच आगीने दुचाकीला वेढले आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली.

Electric Scooter Catches Fire in Betim Goa
Goa Pharma Export Hub: गोवा बनणार औषध निर्यातीचे नवे केंद्र? मोपा-दाबोळी विमानतळांवर मोठी तयारी!

दुचाकीच्या शेजारी पार्क केलेल्या कार आणि बुलेट मोटारसायकललाही आगीची झळ बसली. त्यामुळे या दोन्ही वाहनांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाचे हवालदार रामा नाईक यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती. या दुर्घटनेत एकूण सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com