मडगाव: कुडतरी पंचायतीत प्रभाग फेररचना करताना मोठ्या प्रमाणावर घोळ करून ठेवला आहे. ही फेररचना करताना मतदारसंख्येची समानता या तत्वाला हरताळ फासला असून, हे प्रभाग ठरविताना भौगोलिक सलगताही ठेवण्यात आलेली नाही, असा आरोप केला आहे. फेरराचनेतील या त्रुटी दूर केल्या नाहीत तर सर्व प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचा इशारा दिला. (Elections should be held only after removing all the errors says Sarpanch Kudtari Panchayat)
माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांनी सरपंच मिलाग्रीस रॉड्रिक्स व उपसरपंच सायमन रिबेलो यांच्याबरोबर मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला आहे. कुडतरी पंचायतीचे काही प्रभागात १४०० पेक्षा जास्त मतदार असून, काही प्रभागात फक्त ५०० मतदार आहेत. त्याशिवाय दीड किलोमीटर अंतरावरील भाग दुसऱ्याच प्रभागात जोडून भौगोलिक सलगताही ठेवण्यात आलेली नाही. मागच्या वेळी जे प्रभाग राखीव होते तेच पुन्हा राखीव करण्यासाठी त्यांचे क्रमांक बदलले आहेत. या सर्व त्रुटी दूर करूनच निवडणूक घ्यावी अथवा जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घ्यावी अशी मागणी यावेळी रॉड्रिक्स यांनी केली.
तर कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना आपल्या काही विरोधकांना पंचायतीपासून दूर ठेवायचे असल्याने त्यांनीच सरकारी यंत्रणेला हाताशी धरून हे कारस्थान केले असावे, असा आरोप सायमन बार्रेटो यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.