शेतकरी ठरवणार आंदोलनाची अंतिम दिशा!

मोपा लिंक रोड प्रकरण : उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आज बैठक
Mopa Link Road
Mopa Link Roaddainikgomantak

मोरजी: मोपातील पीडित शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी (ता. २) उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्यासमवेत होणार असून, या बैठकीकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीत जो निर्णय होईल, तो जर शेतकऱ्यांच्या बाजूने किंवा हिताचा झाला नाही तर पीडित शेतकरी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची दाट शक्यता आहे. (Meeting with North Goa District Collector on Mopa Link Road case today)

बुधवारी २ रोजी सकाळी दहा वाजता उत्तर गोवा जिल्हाधिकारी (Collector) यांच्या कार्यालयात शेतकरी आणि प्रमुख आंदोलनकर्त्यांची तसेच वारखंडचे सरपंच संजय तुळसकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सोमवारी (ता. २८) पोलिस निरीक्षक विक्रम नाईक आणि उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्यासोबत प्रमुख आंदोलनकर्त्यांची ॲड. प्रसाद शहापूरकर यांच्या उपस्थितीत चर्चा झाली होती. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली होती. आज (मंगळवारी) उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून ॲड. प्रसाद शहापूरकर यांच्याकडे सकाळी दहा वाजता आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Mopa Link Road
हायकोर्टाची वास्को रेल्वे ट्रॅकिंगला नोटीस

मोपा लिंक रोडसाठी (Mopa Link Road) केंद्र सरकारचे पाठबळ राज्य सरकारला मिळत असल्याने पूर्ण सरकारी यंत्रणेला हाताशी धरून सध्या मोपा लिंग रोडचे काम जोरदारपणे सुरू आहे. सध्या मोपा लिंक परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.

एका बाजूने सरकार (Government) म्हणतो की, पीडित शेतकऱ्यांचे एकूण ६० कोटी रुपये तिजोरीत नुकसान भरपाई म्हणून जमा झालेले आहेत. हे दावे सादर करून त्यांनी आपापली नुकसान भरपाई घ्यावी असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु प्रत्यक्षात ते दावे-प्रतिदावे करत असताना शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सरकारने आजपर्यंत समजावून घेतलेल्या नाहीत. यावरही बुधवारच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com