आमदार तुयेकर यांची नावेलीत कसोटी!

अनेक प्रभागांमध्‍ये भाजपचे कार्यकर्तेच आमनेसामने
उल्हास तुयेकर
उल्हास तुयेकर Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नावेली मतदारसंघातील प्रामुख्याने तीन पंचायतीत भाजप कार्यकर्तेच निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने ही निवडणूक आमदार उल्हास तुयेकर यांच्यासाठी एकप्रकारे अग्निपरीक्षा ठरणार आहे. सदर निवडणूक जरी राजकीय पक्षरहीत असली तरी भाजपने आपले वर्चस्व असलेल्या रुमडामळ, दवर्ली-दिकरपाली व आके-बायश या तीन पंचायतीत आपले पॅनल उभे केले आहे, तर नावेली व तळावली या अल्पसंख्यांकांचे प्राबल्य असलेल्या पंचायतीत काही उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

(MLA Tuyekar's in Goa panchayat election Naveli)

उल्हास तुयेकर
JEE Main Result 2022 : ‘जेईई मेन’ मध्ये अन्वेश बांदेकर गोव्यात प्रथम

आमदार तुयेकर यांच्यासमोर त्यांच्या पक्षांतील काही जणांनी आव्हान उभे केले आहे ते निवडणुकीत स्वतःचे वेगळे पॅनल उभे करून. विशेषतः आके-बायश पंचायतीत माजी सरपंच दामू नाईक यांनी पत्नीसह उमेदवारी दाखल करुन हा पेच निर्माण केला आहे तो आमदारांच्या काही उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या कृतीबद्दल नापसंती व्यक्त करुन. दामू नाईक व सत्यविजय नाईक गटाने तेथील काही प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत.

आमदार तुयेकर यांनी मात्र पक्षातील या घडामोडी अनपेक्षित असल्याचे सांगून काही ठिकाणी एकाहून अधिक भाजपनिष्ठ उमेदवार असले तरी आपण पक्षाचा एकच उमेदवार आहे, तेथेच त्याला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले.

उल्हास तुयेकर
जाणुन घ्या, आजचे तुमच्या शहरातील इंधनाचे दर

यापूर्वी आपणाला विरोध करणाऱ्या काहींनी आके बायशमध्ये उमेदवार उभे केल्याचेही ते म्हणाले. रुमडामळचे माजी सरपंच तसेच दवर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या तुयेकर यांनी शनिवार व रविवारी रुमडामळमध्ये घरोघरी फिरून प्रचार केला.

उर्फान मुल्ला यांचा प्रभाग चर्चेत

रुमडामळमधील प्रभाग 8 मध्ये भाजप प्रवक्ते उर्फान मुल्ला यांना तिरंगी लढतीचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात त्यांचे प्रतिस्पर्धी उम्रान पठाण यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल पोलिसांनी अटक केली होती. त्‍यामुळे हा प्रभाग चर्चेत आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com