Heatwave Alert In Goa: काळजी घ्या! पुढचे सात दिवस सूर्य आग ओकणार, गोवा सरकारची ॲडव्हायझरी प्रसिद्ध

Heatwave Alert In Goa: गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यातील नागरिकांना उष्णतेपासून सुरक्षित राहण्याची सूचना केली आहे.
Heatwave Alert In Goa
Heatwave Alert In GoaDainik Gomantak

Heatwave Alert In Goa

गोव्यात सध्या प्रचंड उकाडा आहे. राज्यातील बहुतांश भाग उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. हवामान खात्याने (IMD) गोव्यात पुढील सात दिवस उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यातील नागरिकांना उष्णतेपासून सुरक्षित राहण्याची सूचना केली आहे.

गोवा प्रशासनाकडून ॲडव्हायझरी प्रसिद्ध

प्रशासनाने जारी केलेल्या ॲडव्हायझरीनुसार, गोव्यात कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले असून पुढील सात दिवस त्यात बदल होण्याची शक्यता नाही.

सर्वसामान्यांसाठी हे तापमान सुसह्य असले तरी लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

ॲडव्हायझरीनुसार, नागरिकांना सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हलक्या रंगाचे सैल आणि सुती कपडे घालण्याची सूचना करण्यात आलीय.

Heatwave Alert In Goa
Goa Congress: गोव्याचा आवाज भारताचा आवाज बनेल! पत्रादेवी येथून काँग्रेस प्रचाराचा शुभारंभ

उन्हाळ्याच्या हंगामात निर्जलीकरण टाळण्यासाठी, नियमित अंतराने पाणी प्यावे. जर तुम्हाला डोकेदुखी, उलट्या आणि घाम येत असेल तर ही उष्माघात किंवा उष्मा क्रॅम्पची लक्षणे असू शकतात. असे झाल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कमाल तापमान 4.5 अंश सेल्सिअस सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी असते तेव्हा उष्णतेची लाट मानली जाते. दरम्यान, गोव्यातील सध्याच्या परिस्थितीला राज्यात उष्णतेची लाट आहे असे म्हणता येणार नाही, असे गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे.

कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल, तेव्हा उष्णतेच्या लाटेची स्थिती विचारात घेतली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com