गोव्यात निवडणूक आयोगाची तयारी सुरू

निवडणुकीच्या काळात धोकादायक असू शकणाऱ्या व्यक्तींची यादीही बनवलेली आहे.
Election Commission preparation
Election Commission preparationDainik Gomantak

वास्को:आगामी विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आव्हान आयोगासमोर असून, आयोगाने निवडणुकीसाठी जोरकस तयारी सुरू केली आहे. त्यानुसार खबरदारीचे उपायही घेण्यात आले आहेत. गोव्यात (Goa) मतदानाचे प्रमाण इतरत्र पेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजलेले आहेत.

Election Commission preparation
गोव्यात रविवारी कोरोनामुळे 8 मृत्यू; राज्यात 1582 नवीन कोरोना बाधित

तसेच राजकीय पक्षांनाही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. जी जी मार्गदर्शक तत्त्वे निवडणूक आयोगातर्फे मांडली आहे, त्याचे पालन राजकीय पक्षांना करावे लागते, त्यानुसार प्रत्येक कानाकोपऱ्यात लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मतदार संघात दोन वेगवेगळे फ्लाईंग स्कॉड नजर ठेवून आहेत. तसेच निवडणुकीच्या काळात धोकादायक असू शकणाऱ्या व्यक्तींची यादीही बनवलेली आहे. संभाव्य धोकादायक ठरू शकणाऱ्या व्यक्तीवर कोणती कारवाई करावी याविषयी निर्णय घेऊन ठेवलेला आहे. धोकादायक व्यक्तींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले जाणार असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

Election Commission preparation
25 दिन में पैसा डबल, 'नीलेश काब्रालची हेरा फेरी'

दरम्यान, निवडणूक (Election) काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी स्टॅटिक सर्व्हे लेन्स टीम प्रत्येक मतदारसंघात तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला भरारी पथके प्रत्येक मतदारसंघात (Constituency) दोन याप्रमाणे स्थापन केली आहेत. अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात अधिक दक्ष राहून गैरप्रकार रोखण्याचे आवाहन या पथकांना केले आहे. दरम्यान मुरगाव तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघाचा आढावा मुरगाव तालुक्याचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस देसाई हे निर्वाचन अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांनी आज कुठ्ठाळी मतदार संघातील संवेदनशील भाग म्हणून प्रत्येक निवडणुकीत ओळखला जातो अश्या झुआरी नगर भागात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रेशियास, मुरगावचे उपअधीक्षक सलीम शेख, तलाठी अनुज सावंत व इतर अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com