Sameer Amunekar
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज (१५ फेब्रुवारी ) प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात पोहोचले. यावेळी त्यांनी सहकुंटुंब त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं.
प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत आणि मुलगी यांनीदेखील त्रिवेणीच्या संगमात पवित्र स्नान केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही गोव्याहून येणाऱ्या लोकांसाठी मोफत गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत हजारो लोक गोव्याहून प्रयागराजला आले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पवित्र स्नानानंतर त्रिवेणी संगमावर पूजा-अर्चना केली.
त्रिवेणी संगमात स्नान केल्यावर अतिशय छान वाटलं, प्रयागराजमधील सुंदरता पाहून खूप सकारात्मकता जाणवली, असं प्रमोद सावंत म्हणाले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत मंत्रिमंडळातील सदस्य आणि आमदारांनीही संगमात स्नान केलं.