Ekcharache Feast: प्रजासत्ताक दिनी एकतेचा उत्सव, खोर्ली गावातले 'एकचाराचे फेस्त'

Republic Day Goa: नेहमी अनुभवत असलेल्या फेस्तापेक्षा एक आगळे फेस्त भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खोर्ली गावात आयोजित झाले होते.
Republic Day Goa Ekcharache Feast
Republic Day Goa Ekcharache FeastDainik Gomantak
Published on
Updated on

Ekcharache Feast Goa

दिवस जत्रांचे आणि फेस्तांचे आहेत.‌ पण नेहमी अनुभवत असलेल्या फेस्तापेक्षा एक आगळे फेस्त भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खोर्ली गावात आयोजित झाले होते. या फेस्तात रेश्मा नमाजवाले मुस्लिम घरात बनवला जाणारा स्वादिष्ट पदार्थ, शेवया घेऊन आली होती, भोमा गावातील अरुंदता वरगावकर हिंदू पद्धतीने बनवले जाणारे नाचण्याचे लाडू घेऊन आली होती तर परपेच्युआ फेर्राव ख्रिसमसच्या निमित्ताने बनवला जाणारा स्वादिष्ट पदार्थ, पिनाका घेऊन आली होती.

या फेस्ताचे नाव होते- एकचाराचे फेस्त (एकतेचा उत्सव). फेस्ताकार मारियेस फर्नांडिस याने हे फेस्त क्युरेट केले होते तर मारियानो आणि परपेच्युआ फेर्राव या फेस्ताचे यजमान होते. संस्कृती, परंपरा आणि समुदाय या घटकांशी प्रतिबद्ध असलेले हे फेस्त प्रजासत्ताक दिनाचा औचित्यपूर्ण उत्सव ठरले.

Republic Day Goa Ekcharache Feast
Old Goa Feast : जुने गोवेत सेंट झेवियरचे २१ नोव्हेंबरपासून फेस्त

काजूगर भाजणे, समुद्री मासे तळणे, गाईचे दूध काढणे, फुलांचा हार विणणे, काजू कच्च्या बीया (बिबे) साफ करून त्यापासून काजूगर मिळवणे इत्यादी उपक्रमातून उपस्थितांना गोव्याच्या पारंपारिक जीवनशैलीची आठवण करून दिली गेली. वनस्पती तज्ज्ञ मिंगेल ब्रागांझा, प्रो.‌ कार्मेलिटो आंद्राद, प्रकाश कामत यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. 

या फेस्तात नृत्य-गायनादी कार्यक्रमांचाही अंतर्भाव होता. त्याशिवाय दिवाडीतील रोसिता हेरेडिया हिने ‘रोतेसांव’ (वेताच्या सालीपासून खुर्च्या विणण्याची कला) कलेचे प्रात्यक्षिक दिले.

Republic Day Goa Ekcharache Feast
Three Kings Feast: शेकडो वर्ष जुना गोव्यातील आगळावेगळा 'तीन राजांचा फेस्टिवल'

या फेस्ताच्या निमित्ताने खोर्ली गावात झालेले पदभ्रमण (पासय) हा या फेस्तातील आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होता. डीन सुरेश कुंकळीकर यांनी या पदभ्रमणात गावातील स्थानिक झाडे, औषधी वनस्पती आणि ऐतिहासिक जागांची ओळख करून दिली. स्थानिक जैवविविधतेच्या महत्वावर भर देऊन आयोजित झालेल्या या पदभ्रमणातून त्यात सहभागी झालेल्या सदस्यांना आपोआपच गावच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक मुळांशी ओळख झाली.

एका दिवसाच्या या फेस्तात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोक एकत्र आले होते. एकजुटीच्या भावनेने साजरे झालेले हे फेस्त त्या दिवसाच्या राष्ट्रीय उत्सवाशी अगदी सुसंगत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com