Gomantak Impact: ‘त्या’ 8 हजार कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला; वेतन जमा

गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाला जाग
Salary
SalaryDainik Gomantak

GHRDC: गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या 8 हजार कर्मचाऱ्यांना अखेर गुरुवारी ऑगस्ट महिन्याचे थकीत वेतन मिळाले. दैनिक ‘गोमन्तक’ने गुरुवारच्या अंकात हे कर्मचारी गणेश चतुर्थीच्या तोंडावर वेतनाविना असल्याने हवालदिल झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

त्या वृत्ताच्या दणक्यानंतर जाग आलेल्या महामंडळाच्या यंत्रणेने गतिमान होत गुरुवारी दुपारनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यावर वेतन जमा होईल, याची व्यवस्था केली.

गेले आठवडाभर जे काम करणे त्यांना शक्य झाले नव्हते, ते काम अवघ्या तीन-चार तासांत त्यांनी केले.

वेतन मिळाल्याने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करतानाच, आपल्या व्यथेला वाचा फोडल्याबद्दल ‘गोमन्तक’ला धन्यवाद दिले. या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Salary
बेरोजगारी, व्यवसायात फटका! गोव्यात तरुण मद्य, अमली पदार्थांच्या आहारी; चारवर्षातील आकडेवारी चिंताजनक

सुरक्षा रक्षकांना दरमहा १६ हजार, जुन्या सफाई कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये, तर नव्या सफाई कर्मचाऱ्यांना १२ हजार रुपये वेतन दिले जाते.

गणेश चतुर्थी चार दिवसांवर आली असतानाही वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले होते. त्यातच एका अधिकाऱ्याने चतुर्थीच्या आदल्या दिवशी वेतन मिळाले तरी पुरे, असे सांगितल्याने ते नाराज झाले होते.

मग लटकते वेतन

महामंडळाकडून विविध सरकारी खाती, स्वायत्त महामंडळे, अशा ठिकाणी या कर्मचाऱ्यांची सेवा पुरवली जाते. त्या बदल्यात त्या खात्यांकडून वेतनापोटी रक्कम महामंडळाकडे जमा केली जाते.

हे सारे करताना दर महिन्याला वित्त खाते, लेखा खाते यांच्याकरवी ती बिले पुढे पाठवली जातात. त्या प्रक्रियेदरम्यान कुठेतरी बिले अडकली की, या कर्मचाऱ्यांचे वेतन चार-पाच दिवस मागे-पुढे होते.

वेतन जमा झाल्याचा संदेश अन्...

‘गोमन्तक’मध्ये आज याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच लेखा खात्यातून बिले सचिवालयात नेत दुपारपर्यंत वेतन अदा करण्याची जबाबदारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर देण्यात आली. त्यांनी ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

खात्यावर वेतन जमा झाल्याचा एसएमएस संदेश कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी ही माहिती ‘गोमन्तक’ला कळविली आणि आनंद व्यक्त केला.

Salary
Cause Of Rabies : सावधान! कुत्र्याने शरीराच्या या ठिकाणी चाटल्यास होऊ शकतो रेबीज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com