Mapusa Court: गोव्यातील जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या! राम प्रभुदेसाई यांची म्हापसा जिल्हा व सत्र न्यायालयात वर्णी

Goa Judges Transfer Orders: गोव्यातील ८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदलीचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानिबंधक आर. एन. जोशी यांनी जारी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक (न्यायिक) न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांची म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा - २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी बदली झाली आहे.
Court
CourtCanva
Published on
Updated on

Mumbai High Court Orders Transfer of 8 District Judges in Goa

पणजी: गोव्यातील ८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदलीचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानिबंधक आर. एन. जोशी यांनी जारी केला आहे. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक (न्यायिक) न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांची म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा - २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी बदली झाली आहे.

महानिबंधकाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, म्हापसा येथील हंगामी जिल्हा -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश शबनम शेख यांची गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिवपदी बदली झाली आहे. गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव न्या. विजया आम्रे यांची मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा - १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी बदली केली आहे. उत्तर गोवा जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्या. सुधीर शिरगावकर यांची गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक (न्यायिक) पदी बदली केली आहे.

दक्षिण गोवा जिल्हा न्यायाधीश - १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्या. क्षमा जोशी यांची मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा - २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी, दक्षिण गोवा जिल्हा न्यायाधीश - २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांची मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा - ३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी बदली करण्यात आली आहे.

Court
Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशपदी शर्मिला पाटील

म्हापसा जिल्हा न्यायाधीश - २ व अतिरिक्त सत्र न्या. शर्मिला पाटील यांची म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी, उत्तर गोवा जिल्हा न्यायाधीश -३ व अतिरिक्त सत्र न्या. पूर्वा नागवेंकर यांची पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा - २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीशपदी बदली करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com