Indian Tradition
Indian Tradition Dainik Gomantak

Culture Of India : भारतीय परंपरा मजबूत करण्याचे प्रयत्न व्हावेत :ॲड. आश्‍विनकुमार उपाध्याय

Culture Of India : फोंड्यात ‘रामराज्य व भारतीय संविधान’वर व्याख्यान

Culture Of India :

बोरी, भारतीय परंपरा ही मजबूत आहे आणि कायद्यापुढे सर्व एक आहेत.

भारतीय संविधानात राम, कृष्ण, हनुमान, महावीर, गुरूगोविंद सिंग, शिवाजी महाराज सारखी २२ चित्रे होती ती पुन्हा आणून भारतीय परंपरा मजबूत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत,असे प्रतिपादन दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ॲड. अश्‍विनकुमार उपाध्याय यांनी केले.

मंगळवार ९ रोजी क्रांतीमैदान फोंडा येथे हिंदू सांस्‍कृतिक न्यास तर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित ‘रामराज्य व भारतीय संविधान’ वरील व्याख्यानात ते बोलत होते.

Indian Tradition
South Goa: 48 तासांत उत्तर द्या! निवडणूक अधिकार्‍याने आप आमदाराला कारणे दाखवा नोटीस का बजावली?

धार्मिक स्थळांची नावे बदलली गेली. मंदिरे तोडली गेली, याला विरोध करणाऱ्यांचे गळे कापून आणि विरोध करणाऱ्यांचा आपला बंद पाडला गेला. युरोपमध्ये धर्मांतर करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला जातो.

आपल्या देशात तसे केले जाते का,असा सवालही उपाध्याय यांनी केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरिंगकर, सचिव मनोज गावकर, अजय सावईकर, आनंद वाघुर्मेकर, संदीप निगळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

खोटे बोलणे अपराध नाही परंतु खोटे बोलणे बदलले पाहिजे. ‘आर्टिकल २०’ बदलणे गरजेचे आहे. मुंदलकाळच्या शाळांत भारताविरूध्द विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. देशात रामराज्य स्थापनेसाठी शिक्षणपद्धती बदलून धर्मपालन करणारी शिक्षण व्यवस्था रुजवायला हवी, असेही ॲड उपाध्याय म्हणाले.

जयंत मिरिंगकर यांनी स्वागत केले. आनंद वाघुर्मेकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. संदीप निगळ्ये यांनी स्वागत केले. सावनी दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. लीना सावईकर यांनीआभार मानले.

देशात एक राष्ट्र एक शिक्षण हवे !

ॲड.आश्‍विनकुमार म्हणाले की, शिक्षणव्यवस्थाही चांगली असायला हवी. शिक्षणात समानता येण्यासाठी सर्वांची पुस्तके एक हवीत, एक राष्ट्र, एक शिक्षण करण्यासाठी आर्टिकल २१, आणि ३० मध्ये बदल व्हायला हवा. भारत धर्मनिरपेक्ष नसून एक धार्मिक राष्ट्र आहे. भारताची संस्कृती परंपरा वेद, पुराण-उपनिषदे प्रसिध्द आहेत,असेही अॅड. उपाध्याय म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com