EDC Loans 2024: ‘ईडीसी’कडून 2024 मध्ये 190 व्यावसायिकांना कर्ज; 100 कोटी पेक्षा जास्त रक्कम वितरित

EDC Goa business support: आर्थिक विकास महामंडळाने (ईडीसी) २०२४ मध्ये १९० व्यावसायिक इच्छुकांना १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जे दिली आहेत.
EDC business loans Goa
EDC business loansCanva
Published on
Updated on

पणजी: आर्थिक विकास महामंडळाने (ईडीसी) २०२४ मध्ये १९० व्यावसायिक इच्छुकांना १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जे दिली आहेत. महामंडळाकडे अजूनही २० अर्ज प्रलंबित आहेत. उदयोन्मुख उद्योजकांनी ईडीसीकडून कर्ज घेतल्यास त्यांना ‘ईडीआयआय’मार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाईल. या व्यावसायिक इच्छुकांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पै आंगले यांनी दिली.

राज्यातील उदयोन्मुख उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ईडीसीकडून प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार यावर्षी जानेवारीपासून प्रशिक्षण सुरू केले जाणार आहे. इंटरप्रिन्युयर्स डेव्हलोपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (ईडीआयआय), अहमदाबाद या संस्थेला गोव्यात प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू करण्यास जागा देण्यात येणार आहे.

या संस्थेतर्फे ८ जानेवारीपासून उदयोन्मुख व्यावसायिकांना हे प्रशिक्षण सुरू केले जाणार आहे व त्यानंतर नियमित प्रशिक्षण कार्यक्रम या केंद्रातर्फे दिले जाणार आहेत, असे आंगले यांनी सांगितले.

EDC business loans Goa
Credit Societies Loans: क्रेडिट सोसायट्यांच्या कर्जाबाबत कडक कायदा, मंत्री शिरोडकरांनी केले सूतोवाच; वाचा

ईडीआयआय केंद्रातर्फे उदयोन्मुख व्यावसायिकांना तीन वेगवेगळ्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. एक दिवसाचे प्रशिक्षणात जनजागृती केली जाणार आहे. शाळा व महाविद्यालयामध्ये एक दिवसाचे हे प्रशिक्षण तेथील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. व्यावसायिक इच्छुकांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक व्यावसायिकाकडून ७५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र या शुल्कात सवलत देताना फक्त ७५० रुपये व्यावसायिकाला भरावे लागतील व उर्वरित शुल्काची रक्कम ही सामाजिक बांधीलकीमधून सरकारतर्फे जमा केली जाईल, असे आंगले म्हणाले.

EDC business loans Goa
Goa: 'दयानंद सुरक्षा' योजनेबाबत मोठा निर्णय! लाभार्थींची संख्या होणार मर्यादित; राज्यात सर्वेक्षण सुरू

२५ लाखपर्यंत कर्ज

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ईडीसीकडून त्याला २५ लाखांपर्यंत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात कर्जही देण्यात येणार आहे. जे व्यावसायिक मुख्यमंत्री रोजगार योजनेतून किंवा ईडीसीकडून कर्ज घेणार असतील त्यांना प्रशिक्षण मोफत दिले जाईल, असे आंगले यांनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com