Goa Fraud Case: 21 कोटींना गंडविले! अधिक परताव्याचे आमिष दाखवून 100 जणांची फसवणूक

Goa Fraud Case: शेअर मार्केट : अधिक परताव्याचे आमिष; 100 जणांची फसवणूक
Goa Fraud Case
Goa Fraud CaseDainik Gomantak

Goa Fraud Case: शेअर मार्केटमध्ये थेट पैसे गुंतवणूक करून चांगल्या रक्कमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून शंभराहून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे 20.83 कोटी रक्कमेचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाच्या (ईओसी) पोलिसांनी सासष्टी तालुक्यातील मायरॉन रॉड्रिग्ज (वय ५३ ) व दीपाली परब (वय ४०) या पती-पत्नीविरुद्ध विश्‍वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Goa Fraud Case
Psoriasis Skin Problem: आता सोरायसिसचा थेट हृदयावर परिणाम? जाणून घ्या लक्षणे

त्यांनी स्वतःला स्टॉक ब्रोकर असल्याचे गुंतवणूकदारांना भासवून पैसे घेतले होते. याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात येतील. यापूर्वी संशयितांविरुद्ध अशाच प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. संशयित मायरॉन रॉड्रिग्ज याने दक्षिण गोव्यातील भागात तो स्टॉक एक्स्चेंजमध्ये ‘स्टॉक ब्रोकर’ व गुंतवणूक सल्लागार असल्याची, तर संशयित दीपाली परब हिने स्वतः आर्थिक व्यवहारातील तज्ज्ञ असल्याची प्रतिमा तयार केली होती.

गोव्यातील अनेक गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्याचा व्यवहार आम्ही पाहतो तसेच गुंतवणुकदारांची रक्कम थेट स्टॉक मार्केटमध्ये गुंतवली जात असल्याचे ते सांगत होते. या गुंतवणुकीतून चांगल्या रक्कमेचा परतावा दिला जात असल्याचे आमिष काही लोकांना दाखवले. शेअर मार्केटमध्ये पैसे कसे झपाट्याने जादा मिळतात त्याचे सादरीकरणही ते दाखवत होते.

संशयितांच्या आमिषाला भुलून काही गुंतवणूकदारांनी झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने संशयितांकडे मोठ्या रक्कमा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास दिल्या होत्या. या रक्कम गुंतवणूकदारांनी आरटीजीएस, नेफ्टी तसेच धनादेशाद्वारे संशयित मायरॉन रॉड्रिग्ज याच्या खात्यावर ट्रान्स्फर केल्या होत्या.

मात्र, गुंतवणूक केलेली मूळ रक्कम व परताव्यासह परत करण्याची मागणी केली असता संशयित टोलवाटोलवी करू लागला. त्यांनी गुंतवणूकदारांचे फोन घेणे व भेटणेही टाळू लागला. त्यामुळे त्याने गुंतवणूकदारांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याने काही गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे कक्षाकडे तक्रार दाखल केली होती. संशयितांनी गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध भादंसंच्या कलम ४०६ व ४२० खाली गुन्हा दाखल केला आह. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पी. रामनाथकर करत आहेत.

आयवन आल्मेदा यांचे ३६.५४ लाख लुटले : मायरॉन रॉड्रिग्ज व दीपाली परब या पती-पत्नीने नावेली येथील आयवन आल्मेदा या ज्येष्ठ नागरिकाला स्टॉक ट्रेडिंग करण्यास भाग पाडून ३६.५४ लाखांची फसवणूक केली आहे. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त परतावा कसा मिळतो हे या जोडप्याने आयवन आल्मेदा यांना पटवून देऊन त्यांचे पैसे लुटले.

संशयिताचे पलायन

संशयित मायरॉन रॉड्रिग्ज हा पूर्वी मुंबईत राहत होता. गोव्यात त्याने मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आपले सावज बनवले व त्याने ही रक्कम स्टॉक मार्केटमध्ये गुंतवल्याचे सांगून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. गुंतवणूकदारांना देय असलेली मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम देण्याऐवजी त्याने भारतातूनच पळ काढला आहे. त्याच्याकडे अनेक देशांचे व्हिसा आहेत. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Goa Fraud Case
Side Effects Of Sunscreen: सनस्क्रीनच्या अतिवापरामुळे वाढत आहे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण

दीपाली परब ही त्याची दुसरी पत्नी आहे. पोलिसांनी तिची जबानी नोंद केली आहे. मात्र, तिने या व्यवहाराबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले आहे. मुख्य सूत्रधार मायरॉन रॉड्रिग्ज हा भारतात न आल्यास त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी इंटरपोल एजन्सीची मदत घेण्याची आवश्‍यकता भासू शकते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

गुंतवणूकदारांची पोलिसांत धाव : या जोडप्याने गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांची रक्कम चांगली वाढत असल्याची वारंवार माहिती दिली.

रक्कम वाढत असल्याने गुंतवणूकदारही खूष होते. मात्र, ज्यावेळी ही रक्कम परत करण्याची वेळ आली, त्यावेळी संशयित जोडप्याने त्यातून अंग काढून घेतले. त्यामुळे अखेर गुंतवणूकदारांना पोलिसांत धाव घ्यावी लागली.

व्याज दर घसरल्याने ठेवी गुंतवल्या

कोविड काळात बँकांमधील ठेव रक्कमेवरील व्याजाच्या दरात घसरण झाल्याने काहींनी आपल्या ठेव रक्कमा शेअर मार्केटमध्ये जादा मोबदला मिळवण्यासाठी गुंतवणूक केल्या होत्या. या संशयित जोडप्याने या परिस्थितीचा फायदा उठवून मोठी रक्कम गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांना गाठले. त्यांना स्टॉक ट्रेडिंगमध्ये जादा फायदा असल्याचे सांगून त्यांना मोठ्या व्याजाचे आमिष दाखवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com