

गोव्यात 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) सोमवारी (27 ऑक्टोबर) एक मोठी घोषणा केली. बिहारमध्ये मतदारांच्या यादीच्या विशेष सुधारणा मोहिम ('SIR' - Special Intensive Revision) यशस्वी झाल्यानंतर आता गोव्यासह देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी या दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली. बिहारमधील 'एसआयआर' मोहीम यशस्वी झाल्यानंतर आयोगाने देशातील 36 राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला.
गोव्यात (Goa) 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गोव्यात सद्यस्थितीत 11.85 लाख मतदार असून, 1,725 मतदान केंद्रे/बीएलओ (Polling Stations/BLOS) आहेत. यासह 669 राजकीय पक्षाचे बीएलएएस (Political Party BLAS) आणि 80 ईआरओ/एईआरओ (EROS/AERO) कार्यरत आहेत.
पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Election) होणार आहेत, त्या राज्यांमध्ये ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. गोव्यासह तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये 'एसआयआर' मोहीम राबवली जाईल.
या 'एसआयआर' मोहिमेमध्ये घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी केली जाते. याचा उद्देश मतदार यादीतून डुप्लिकेट, मृत आणि अपात्र नावे वगळून केवळ पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे, हा आहे. मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी आयोगाने हे मोठे पाऊल उचलले आहे. यापूर्वी, 6 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरात मतदार यादी दुरुस्तीची मोहीम राबवण्याची घोषणा करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.