Mankurad Mango: आंब्यांच्या ‘राजा’ आला रे! माणकुराद, हापूस बाजारात विक्रीसाठी; काय आहेत दर? जाणून घ्या..

Goa Mango Season Price: झाडांना नुकताच मोहर फुटत असतानाच बाजारात आंबे दिसू लागल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मानकुराद आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
Mango Season Goa
Mango Season GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गोव्यात आंब्यांचा हंगाम साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतो. मात्र, यंदा मडगावात आंब्यांच्या ‘राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानकुराद आंब्यांची गुरुवारीच विक्री सुरू झाल्याने आंब्यांच्या मोसमाची चाहूल लागली आहे. झाडांना नुकताच मोहर फुटत असतानाच बाजारात आंबे दिसू लागल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

गोमंत विद्या निकेतन समोरील आबाद फारिया रस्त्याच्या बाजूला दरवर्षी आंबे विकणाऱ्या एका व्यापाऱ्याकडे हे मानकुराद आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध असलेल्या मानकुराद आंब्यांचा दर प्रत्येकी सुमारे ६०० रुपये इतका ठेवण्यात आला होता.

Mango Season Goa
Mango Farming: आंब्याला लवकर मोहोर हवाय? बागेत करा 'हे' बदल आणि पहा चमत्कार

तसेच, हापूस आंबेही बाजारात दाखल झाले असून त्यांची विक्री सुमारे १५०० रुपये डझन दराने करण्यात येत आहे. हंगामाच्या सुरुवातीला आंब्यांची आवक कमी असल्याने दर अधिक असतात, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Mango Season Goa
Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

पुढील काही आठवड्यांत मोठ्या प्रमाणात आंबे बाजारात येण्याची शक्यता असून त्यानंतर दरात घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आंब्यांच्या लवकर आगमनामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आंबा प्रेमी हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com