Sameer Amunekar
ऑक्टोबर–नोव्हेंबर महिन्यात 25–30 दिवस पाणी बंद ठेवल्यास झाडाला ताण (Stress) मिळतो आणि मोहोर येण्यास चालना मिळते.
जास्त नत्र दिल्यास फक्त पालवी वाढते. सप्टेंबरनंतर युरिया टाळावा, त्यामुळे फुलोरा लवकर येतो.
सप्टेंबर–ऑक्टोबरमध्ये SSP, DAP किंवा पोटॅशयुक्त खत दिल्यास फुलकळी तयार होण्यास मदत होते.
10–15 वर्षांवरील झाडांसाठी ऑक्टोबरमध्ये मातीमध्ये ड्रेंचिंग केल्यास मोहोर लवकर व एकसारखा येतो. (कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वापर करावा.)
ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये अनावश्यक, रोगट व जास्त दाट फांद्या काढाव्यात. यामुळे झाडाला ऊर्जा मोहोरासाठी मिळते.
झिंक, बोरॉन व मॅग्नेशियमयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास फुलोरा सुधारतो.
भुरी, तुडतुडे, फुलकिडे यांचा वेळेत बंदोबस्त केल्यास मोहोर येण्यावर विपरीत परिणाम होत नाही.