Viral Video: गोव्यातील Beach वर पर्यटकांची तुंबळ गर्दी, कोरोना नियमांना तिलांजली

गोव्यातील (Goa) कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळावर मोठी गर्दी दिसून येत आहे.
Crowd

Crowd

Dainik Gomantak 

Published on
Updated on

गोव्यातील (Goa) कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळावर मोठी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीचा एक व्हिडिओ समोर आला असून, जो ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. डिसेंबरच्या अखेरीपासून गोव्यात पर्यटकांची (Tourists) मोठी गर्दी होत आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी इतर राज्यातून मोठ्या संख्येने लोक गोव्यात येतात. हा व्हिडीओ शेअर करताना @Herman_Gomes नावाच्या ट्विटर युजरने लिहिले की, 'कोरोना लाटेत शाही स्वागत आहे.

<div class="paragraphs"><p>Crowd</p></div>
गोव्यात नव वर्षाच्या स्वागतानंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पॉझिटीव्हीटी रेट 10.7% पर्यंत !

आरोग्य विभागाच्या मते, गोव्यात रविवारी 388 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाचा पॉझिटीव्हीटी रेट देखील 10 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. ख्रिसमस ते नववर्ष साजरे या कालावधीत गोव्यात आलेल्या मोठ्या संख्येने पर्यटक हे राज्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांच्या पुढे जाण्यास कारणीभूत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

शिवाय, कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण बाधितांची संख्या एक लाख 81 हजार 570 झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 3523 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com